मुंबई: पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस (congress) अंतर्गत कलह समोर आला आहे. पाचही राज्यातील पराभवावर काँग्रेस हायकमांडने चिंतन सुरू केलेलं असतानाच काँग्रेसच्या काही नेत्यांनी थेट गांधी कुटुंबाने (gandhi family) पक्षाचं नेतृत्व सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसला खरोखरच काही अस्तित्व राहणार आहे का? गांधी कुटुंबाला नेतृत्वापासून बाजूला केलं तर काँग्रेसमध्ये पक्षाची धुरा सांभाळणारा कोणी नवा चेहरा आहे का? नव्या नेतृत्वामुळे काँग्रेसला कितपत नवसंजीवनी मिळेल? नवं नेतृत्व मोदी-शहांच्या भाजपला (bjp) रोखू शकेल का? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत. ‘टीव्ही9 मराठी’नेही गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल? असा सवाल करणारा पोल घेतला होता. त्यात 54 टक्के लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. याचा अर्थ गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसला काहीच अर्थ उरणार नसल्याचं या लोकांचं म्हणणं आहे.
पाच राज्यातील निवडणुका, काँग्रेस नेत्यांची विधाने या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’ने एक पोल घेतला. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल? असा सवाल या पोलमधून करण्यात आला होता. ‘होय’, ‘नाही’ आणि ‘सांगता येत नाही’ असे पर्याय मतांसाठी देण्यात आले होते. शिवाय हा पोल युट्यूबवर 17 तास ठेवण्यात आला होता. या पोलमध्ये 64 हजार 935 लोकांनी भाग घेतला होता. या 17 तासातील आलेली ही आकडेवारी बरंच काही सांगून जाणारी आहे. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल? असा सवाल केला असता त्याला 54 टक्के लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. 37 टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं तर 9 टक्के लोकांनी ‘सांगता येत नाही’, असं उत्तर दिलं. यावरून गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसचं अस्तित्व नगण्य असल्याचंही या पोलमधून स्पष्ट होत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना थेट काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचं नेतृत्वं सोडावं आणि इतरांना संधी द्यावी. काँग्रेस सर्वांचीच व्हायला हवी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.
आता कुटुंबाची काँग्रेस ऐवजी सर्वांची काँग्रेस होण्याची गरज आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचे मला आश्चर्य वाटले नाही. त्याचा मला आधीच अंदाज होता. 2014पासून आमची सातत्याने घसरण होत आहे. आम्ही एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहोत. ज्या राज्यात आम्हाला यश मिळालं, तिथले कार्यकर्तेही सोबत ठेवण्यात आम्ही अपयशी ठरलो. या दरम्यान काँग्रेसचे प्रमुख नेते गायब झाले आहेत. जे नेतृत्व करू शकत होते ते काँग्रेसपासून दूर जात आहेत. 2022च्या विधानसभा निवडणुकीतही नेतृत्व करू शकणारे नेते सोडून गेले आहेत. मी आकडे पाहत होतो. त्यातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 2014पासून आतापर्यंत 177 खासदार, आमदारांसह आणि सुमारे 222 उमेदवार काँग्रेसला सोडून गेले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणवर नेते सोडून गेल्याचं कधीच पाहिलं नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या: