रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दिसलेल्या एका विचित्र ताऱ्याची चर्चा रंगली आहे. हा तारा काहींनी कॅमेऱ्यातही (Camera) कैद केलाय. एकामागोमाग एक चालत असलेली आणि कॅमेऱ्यात कैद झालेली ही गोष्ट तारा होती की आणखी काही होती, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आलंय.
20 डिसेंबरला संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात एक विचित्र गोष्ट आकाशात दिसली. ताऱ्यासारखी भासणारी आणि प्रकाशनमात होणारी ही गोष्ट कॅमेऱ्यात कैद करम्यात आली. ही गोष्ट परग्रहावरील तबकडी होती की युएफओ होती, यावरुन चर्चा रंगली आहे. दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile Camera) ही गोष्ट कैद केली. चांगल्या दर्जाचा DSLR कॅमेरा आणून, त्यातही त्यांनी या गोष्टीला कॅमेऱ्यात कैद करण्याता प्रयत्न केला होता. मात्र तोपर्यंत ही गोष्टी नाहीशी झाल्याचं, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.
रत्नागिरी शहर आणि संगमेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरील लोकांनी आकाश दिसलेल्या या विचित्र गोष्टीला पाहिल्याचं सांगितलंय. एका सरळ रेषेत एका-मागोमाग एक तारे जात असल्याचं यावेळी दिसून आलंय. पण हे तारेच होते की आणखी काही होतं, याबाबत अधिक स्पष्टता येऊ शकलेली नाही.
दरम्यान, काहींनी हा तारा नसून उपग्रह असल्याचाही संशय व्यक्त केला आहे. सध्या इंटरनेट सेवेबाबत एलन मस्क यांची कंपनी विविध प्रयोग करत असून त्यासाठी मोठ्या संख्येनं उपग्रह अवकाशात सोडले गेले आहेत. रत्नागिरीत दिसलेली गोष्ट तारा नसून या उपग्रहाचाच भाग होती, असंही मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे. रत्नागिरीसोबत काश्मीर, मंगलोरमध्येही अशीच गोष्ट अनेकांना आकाशात दिसून आली आहे. मात्र नेमकी गोष्ट आहे काय? याबाबत ठोस माहिती कुणीच देऊ शकलेलं नाही. सध्या संपूर्ण रत्नागिरीत एकामागोमाग प्रवास केलेल्या या ताऱ्यांच्या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पाहा व्हिडीओ –