nashik pune railway: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प कुठे अडखडला? आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच सांगितले प्रकल्पाचे काय होणार?

| Updated on: Oct 04, 2024 | 2:29 PM

pune-nashik railway project latest news: पुणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामुळे देशभरातून अनेक जण पुण्यात येतात. पुण्यातील रेल्वे प्रवाशांची गर्दी पहिल्यावर या ठिकाणी चार मोठे टर्मिनल बनवण्याचा निर्णय झाल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.

nashik pune railway: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प कुठे अडखडला? आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच सांगितले प्रकल्पाचे काय होणार?
ashwini vaishnaw
Follow us on

Pune-Nashik semi-high-speed rail line: नाशिक आणि पुणे ही राज्यातील दोन शहरे रेल्वेने जोडली गेली नाही. यामुळे या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु होते. परंतु त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग घेतला नाही. नाशिकमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शुक्रवारी पोहचले. रेल्वे सुरक्षा दलाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात सुरु असलेले रेल्वेचे प्रकल्प आणि कामांची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे काम कुठे अडखडले आहे? हे त्यांनी सांगितले. नाशिक पुणे रेल्वे प्रोजेक्ट मंजूर झाला आहे. परंतु हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी एक अडचण निर्माण झाली आहे. ती अडचण सोडवली जात असून त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.

पुण्यात होणार चार मोठे टर्मिनल

पुणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामुळे देशभरातून अनेक जण पुण्यात येतात. पुण्यातील रेल्वे प्रवाशांची गर्दी पहिल्यावर या ठिकाणी चार मोठे टर्मिनल बनवण्याचा निर्णय झाल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले. ते म्हणाले, चार रेल्वे टर्मिनल झाल्यानंतर पुण्याची रेल्वे क्षमता वाढणार आहे. पुणे येथे नारायणपूर, खोडा येथे ४३ देशांनी प्रकल्प केला आहे.

नाशिक-शिर्डीवरुन दक्षिण भारत गाठणार

नाशिक – शिर्डीवरुन दक्षिण भारत गाठता येईल, यासाठी नवीन योजना तयार केली जात आहे. ती प्रत्यक्षात आल्यावर लवकरच नाशिक, शिर्डीवरुन दक्षिण भारत गाठता येणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन नव्याने तयार होणार आहे. त्याची डिझाईन कशी असावी हे नाशिककर, पत्रकार, विद्यार्थी यांनी ठरवावे. नाशिक जिल्ह्यातील शेती शेतकरी यांच्यासाठी कशी व्यवस्था केली जाईल, त्याचा विचार सुरु आहे. रेल्वेची जमीन वापरून कॉल्ड स्टोरेज उभारण्याचा प्रस्ताव अनेकांनी दिला आहे. त्यावर विचार सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वाधिक रेल्वे स्थानकांची कामे महाराष्ट्रात

देशात १३३७ रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी करण्याची कामे हाती घेतली आहे. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात होत आहेत. मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी होत आहे. तसेच अजनी, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, हडपसर, इतवारी, जालना, लासालगाव, नांदगाव, खेडगाव सोलापूर, हातकणंगले, ग्रँट रोड यासारख्या अनेक रेल्वे स्थांकांचे रेल्वे डिझाईन तयार झाले आहे. त्याचीही काही काम सुरू झाली आहेत.

आधी ११०० कोटी मिळायचे आता १६ हजार कोटी

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात ११०० कोटींची रेल्वेची कामे होत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मंजूर केले आहेत. रिजनल ट्रेन कॉन्सेप्ट मोदीजी घेऊन आले आहेत. नमो भारत रॅपिड नाव आहे. महाराष्ट्रात नवीन रेल्वे ट्रॅकची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. तसेच ३०० हजार नवीन रेल्वे गाड्या तयार होणार आहेत.