mahayuti mahavikas aghadi: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले. यंदा राज्यात मतदानाचा नवीन उच्चांक निर्माण झाला. गेल्या ३० वर्षांतील विक्रम मोडला. विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी येणार आहे. दुपारी १ पर्यंत राज्यात कोणाचे सरकार येणार? यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. निकालापूर्वी विविध ठिकाणी पैजा लागल्या आहेत. सट्टेबाजारही तेजीत आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात निवडणूक निकालावर लागला 50 कोटींचा सट्टा लागला आहे.
विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचार मोहीम राबवली होती. त्यामुळे सर्वत्र चुरशीची लढत आहे. एक्झिट पोलचे आकडे दोघांमध्ये चुरशीची लढत दाखवत आहे. त्यामुळे सट्टेबाजाराचा अंदाज वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. कोणाचे सरकार येणार? कोणता उमेदवार विजय होणार? यावर सट्टा लागला आहे.
छत्रपती संभाजी नगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभेवर सट्टा लागला आहे. कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजीत आहे. संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुकी देखील संभ्रमात आहे. कोण निवडून येईल याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. सर्वाधिक संभ्रम पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे निघणार की शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ निवडून येणार? याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या मतदार संघात शिरसाट यांना सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी बरीच राजकीय समीकरणे जुळवावी लागत आहेत.
फलौदी सट्टा बाजारानुसार महायुती 142-151 जागांवर विजय मिळवत सत्तेवर येत आहे. बीकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजारात विधानसभा निवडणुकीबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यांनी भाजप नेतृत्वाखाली महायुती सत्तेत येत असल्याचे म्हटले आहे. परंतु महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विजयाचे आंतर कमी असणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली आहे.