नागपूर – 2019 विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. आता चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. यानिमित्तान त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सहळ्या टीकाकारांना योग्य उत्तर दिले आहे. पक्षाची शिस्त आणि सातत्य जी मंडळी पाळतात, त्यांना कधीही मागे बघावे लागत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. त्यावेळी चर्चा करणाऱ्यांना भीती होती की बावनकुळे यांची रजकीय कारकीर्द संपले, पण तेव्हा आपण बावनकुळे हे आहेत, त्यापेक्षा मोठे झालेले असतील असे विधान केले होते, ्से फडणवीस यांनी सांगितले आणि आज ते प्रत्यक्षात समोर दिसते आहे, असे सांगत त्यांनी सगळ्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.
ज्यावेळी बावनकुळे यांनी विधानसभा न लढता, 32 मतदारसंघांची जबाबदारी द्यावी, असा निर्णय पक्षाने घेतला. त्यावेळी अनेकांना असं वाटतं होतं की आता बावनकुळे यांचं राजकारण संपलं. अनेक जणं असे बोलायचे देखील. मी त्यावेळेसचं सांगितलं होतं, कारण भाजपातची निती आणि रिती मला माहिती आहे. बावनकुळेंसारख्या कार्यकर्त्याचं महत्त्व भाजपासारख्या पक्षाला माहिती आहे. म्हणून त्याचवेळी मी सांगितलं होतं की, तुम्ही विचा करताय त्यापेक्षा मोठे बावनकुळे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. कधीतरी विधिमंडळातील आमदारांनी पक्षासाठी काम करावं. संघटनेच्या लोकांनी कधी विधिमंडळात काम केलं पाहिजे. हे भाजपात नेहमीचं होतं. अनेकवेळा मोठमोठ्या नेत्यांना आपण सांगतो की आता पक्षाची आवश्यकता आहे. तुम्ही आता मंत्रिपद घेऊ नका पक्षाचं काम करा. कारण सगळ्यांनीच जर विधिमंडळात काम केलं तर पक्ष हा विधिमंडळाच्या कामानं वाढत नाही. त्यानं मतदार वाढतील. पण संघटनाही काम करुन वाढत असते.
याा अभिमान आहे की, ज्या दिवशी निर्णय झाला त्यानंतर एकही दिवस बावनकुळे थांबले नाहीत. त्यांनी तत्काळ निर्णय स्वीकारला आणि ताकदीने काम सुरु केलं. त्या निवडणुकीत 32मतदारसंघात पूर्णपणे दौरे करुन मतदारसंघ निवडून येतील यासाठी प्रयत्न केला. भाजपात सातत्य, पक्षशिस्त पाळणाऱ्यांना मागे पाहावे लागत नाही. आज त्याचं उदाहरण बावनकुळे आहेत. ते पक्षाच्या सर्वोच्च स्थानावर ते बसले आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्षाचा विस्तार होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात नितीन गडकरींमुळे महाराष्ट्राची इज्जत वाचली, असेही फडमवीस म्हणाले आहेत. त्या काळात नितीन गडकरी यांनी मोठे इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरु केले म्हणून राज्याची इभ्रत वाचली, असे फडणवीस म्हणाले. नाहीतर खड्ड्यांचा महाराष्ट्र अशी अवस्था होती. ती दूर करुन आता रस्ते, पुलं, पिण्याच्या पाण्याच्या योजना, इन्फ्रा प्रोजेक्टच्या बळावर मजबूत महाराष्ट्र उभा करु. असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.