पुणे – अयोध्या दौऱ्याला (Ayodhya tour)विरोधाचा ट्रॅप होता, असे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी अयोध्या वारी न केल्याचे कारण दिले असले तरी यानिमित्ताने त्यांनी केलेल्या काही विधानाने ते भाजपावर (BJP)नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उ. प्रदेशातला एक खासदार उठतो आणि उ. प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगताही येणार नाहीत. असे ते म्हणाले. यावरुन त्यांची अयोध्या दौऱ्याला झालेल्या विरोधावरुन भाजपावर नाराजी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज ठाकरे भाषणात म्हणाले – अयोध्या दौरा रद्द काही लोकांना वाईट वाटलं काहींना आनंद झाला. काही लोक कुत्सित बोलत होते. त्यामुळे दोन दिवसांचा मुद्दाम बफर दिला. काय बोलयाचं ते बोला. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र आणि देशाला सांगेल. ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मला मुंबईतून माहीत मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. त्यानंतर लक्षात आलं हा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकलं नाही पाहिजे. यासाठी रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला.
मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक, हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही, असं सांगत त्यांनी भाजपावरही नाव न घेता रोष व्यक्त केला आहे.
राज यांनी कार्यकर्त्यांनाही हे राजकारण समजून घेण्याचं वाहान केलं आहे. हे आता कसं काय सुरू झालं अचानक, असा प्रश्न त्यांनी विचारला. ज्यांना हिंदूत्व झोंबलं लाऊडस्पीकर झोंबले. आपल्या विरोधात सर्व एकत्र येतात, नाहीतर भांडत असतात. असं सांगत त्यांनी शिवसेनेबरोबरच भाजपालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या हनुमानचालिसा पठणाच्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली मातोश्री ही काय मशीद आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राणा दाम्पत्याच्या आंदोलनाला भाजपाची फूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावर टीका करुन राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपा मनसे यांची युती होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे यांनी गेल्या काही काळात भोंग्याच्या निमित्ताने उपस्थित केलेला हिंदुत्वाचा मुद्दा चांगला गाजतोही आहे. अशा स्थितीत त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपातून रसद पुरवली जाणे, अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. अयोध्येचे खासदार ब्रजभूषण यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील बड्या नेत्यांनीही रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याने, राज ठाकरे नाराज असण्याची शक्यता आहे. उलट भाजपाच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनीही राज ठाकरेंनी उ. भारतीयांची माफी मागावी, असा सूर व्यक्त केला.
आत्ता मनसेची अडचण अशी झाली आहे की, सध्याची त्यांची संख्याबळाची स्थिती पाहली तर एक आमदार आणि महापालिकांतील नगरसेवक वगळता राज ठाकरेंच्या मनसेकडे फारसे काही नाही. अशा स्थितीत या महापालिका निवडणुकीत आणि पुढेही राजकीय पटलावर विस्तारायचं असेल तर राज ठाकरेंना भाजपाशिवाय त्यांच्यापुढे पर्याय दिसत नाही. त्यामुळे सध्या ते भाजपाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यामुळे काही बाबी सांगता येत नाहीत, असे संकेत त्यांनी दिलेत.
मुंबई महापालिकेत राज ठाकरेंना सोबत घेतल्यास राज्यात भाजपाला फायदा होईल हे नक्की. ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष होईल, आणि त्याचा लाभ भाजपालाच होील. मात्र उ. भारतात राज ठाकरे भाजपासोबत गेल्याने, पक्षाची हानी होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना दोनच वर्षे राहिलेली असताना, हा मुद्दा प्रचारात महत्त्वाचाही ठरु शकतो. त्यामुळेच भाजपा यात सर्वसमावेशक तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे.