म्हणून संगिता चेंदवणकर यांना तिकीट आणि राजू पाटीलचा अभिमान – राज ठाकरे

| Updated on: Nov 04, 2024 | 8:09 PM

Raj Thackeray Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. पहिल्याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना काँग्रेस सोबत सत्तेत जाऊन बसली आणि बाळासाहेबांपुढे जनाब लागले. हे किती लाजीरवाणी गोष्ट आहे.

म्हणून संगिता चेंदवणकर यांना तिकीट आणि राजू पाटीलचा अभिमान - राज ठाकरे
Follow us on

राज ठाकरे यांनी डोंबिवलीत आज निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. आपल्या पहिल्याच सभेत त्यांनी त्यांच्या टार्गेटवर कोण असणार आहे याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे यांनी सभेत उद्धव ठाकरे यांना पहिले लक्ष्य केलं. त्यांच्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर ही टीका केली. राज ठाकरे यांनी गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय घडलं त्याची उजळणी करण्याचं आवाहन देखील केलं. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मला राजू पाटीलचा अभिमान आहे.

राज ठाकरे म्हणाले की, संगिता चेंदवणकर तुम्हाला माहित आहे की, बदलापूरचं लहान मुलीचं प्रकरण त्यांनी बाहेर काढलं. एका भगिनीने हे प्रकरण बाहेर काढलं आणि अख्ख प्रशासन हलवलं. त्यासाठी शाब्बास की म्हणून मी त्यांना तिकीट दिलं. कालपासून दिवाळी संपलीचे आता आजपासून आमचे फटाखे. आज ही पहिली सभा आहे. मी फक्त आज तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुमच्याकडून हमी घेण्यासाठी आलो आहे. जिथे जिथे मनसेचे उमेदवार असतील तिथे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे. गेले पाच वर्ष आपण हा महाराष्ट्र पाहतोय. काय सुरु आहे महाराष्ट्रात. २०१९ ला ज्यांनी मतदान केलं युती असो की आघाडी. कोण कुठे आहे हेच कळत नाहीये. पाच वर्षात जे घडलं त्याची उजळणी झाली पाहिजे.

राज ठाकरे म्हणाले की, ‘कोणी कुठेही गेले तरी आमचा राजू विधानसभेत एकटा होता. मला त्य़ाचा अभिमान आहे. माझा आमदार हा विकणारा नाही तर टिकणारा होता. माझी निशाणी घेऊन जाऊ शकला असता. भाजप आणि शिवसेनेसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी होती. त्यानंतर सकाळचा शपथविधी झाला. पण १५ मिनिटात लग्न मोडलं. काका मला माफ करा. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की अमित शाह यांनी शब्द दिला होता.’

‘उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदी म्हणाले होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हणाले तेव्हा आक्षेप का नाही घेतला. निकाल लागेपर्यंत कोणीच काही बोलेना. निकाल लागल्यानंतर त्यांना कळालं की आमच्याशिवाय यांचं सरकार बसणार नाही. लगेच मुख्यमंत्रीपद मागायला लागले.’ असं राज ठाकरे म्हणाले.

‘राजू पाटील यांनी कोविड काळात किती काम केलं. हॉस्पीटल सगळयांसाठी देऊन टाकलं. राजू पाटील तुमचा आहे. एका नव्या उमेदीने पुन्हा सगळं उभं करतोय, सगळ्यांच्या पाठिमागे तुमचे आशीर्वाद असावे.’ असं ही शेवटी राज ठाकरे म्हणाले.