उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य गेले कुठे ? देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला तो पैलू

| Updated on: Jan 10, 2025 | 8:48 PM

eknath shinde and devendra fadnavis: उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही, त्यामुळे ते नाराज आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. परंतु एकनाथ शिंदे यांचे व्यक्तीमत्व वेगळे आहेत.

उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य गेले कुठे ? देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला तो पैलू
eknath shinde and devendra fadnavis
Follow us on

eknath shinde and devendra fadnavis: विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. निवडमुकीत 132 जागा भाजपला मिळाल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणे हे जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवडले नसते. त्यावेळी माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. परंतु त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगेच सांगितले होते की, भाजप हाच मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. माझी काही हरकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. मग एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील हास्य गेले कुठे? त्याचेही उत्तर फडणवीस यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांना सांगितले अन्…

मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व्हावे की नाही? हा मोठा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. त्यावेळी ते निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यामुळे माध्यमांमध्ये बातम्या सुरु झाल्या. त्यावेळी मी त्यांच्यांशी चर्चा केली. माझा अनुभव सांगितला. त्यांना सांगितलं की, तुम्हाला पक्ष चालवायचा आहे. फुट पडल्यानंतर शिवसेना नवीन पक्ष आहे. या परिस्थितीत सत्तेच्या बाहेर राहून पक्ष चालवने अवघड जाईल. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आले तर पक्षासाठी ते फायद्याचे असणार आहे. त्यांना सरकारमध्ये येण्याचे महत्व पटवून दिले.अखेर त्यांनी ते मान्य झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले.

एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य का नाही?

उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही, त्यामुळे ते नाराज आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. परंतु एकनाथ शिंदे यांचे व्यक्तीमत्व वेगळे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कधी हास्य नसते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. परंतु मुख्यमंत्री असल्यामुळे त्यावेळी कोणी तसे म्हटले नाही. परंतु उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही, त्यामुळे ते नाराज आहे, अशी चर्चा होते. परंतु त्यांचे व्यक्तीमत्व तसेच आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांनी भेटून बुके दिले. त्याबाबच विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दक्षिण राज्यात राजकारणातील नेते ‘खून के प्यासे’ होते. परंतु महाराष्ट्रात तशी परिस्थिती नव्हती. २०१९ मध्ये काही प्रमाणात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात पुन्हा आपलीच राजकीय संस्कृती आणयाची असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सर्व विरोधी पक्ष भेटण्यास येऊ लागले, असे फडणवीस यांनी म्हटले.