…मग छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक का म्हटले जायचे? छगन भुजबळ यांनी असं का म्हंटलं?

| Updated on: Jan 03, 2023 | 4:40 PM

मग गोब्राम्हण प्रतिपालक असे का म्हटले गेले ? मी सर्व ब्राम्हण जातीबद्दल बोलत नाही. महात्मा फुलेंना त्याच्या कार्यात सहकार्य करणारे देखील अनेक ब्राम्हण होते असं भुजबळ यांनी म्हंटले आहे.

...मग छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक का म्हटले जायचे? छगन भुजबळ यांनी असं का म्हंटलं?
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते, त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी बोलणं टाळत दुसऱ्याच मुद्दा समोर आणला आहे. विशेषणं देत असतांना वेगवेगळे मुद्दे समोर येऊ शकतात असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलणं टाळत नवा मुद्दा छेडला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने छगन भुजबळ हे पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा समोर आणला आहे. शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक असे का म्हणतात असा सवाल उपस्थित केला आहे, शिवाजी महाराज यांच्यासोबत तानाजी मालुसरे होते ते कुणबी होते, शिवा काशीद नाव्ही होते, दलित समाजाचेही लोक त्यांच्यासोबत होते मग त्यांचे शिवाजी महाराज नाहीत का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. महाराज फक्त काय ब्रम्हणांचे पालक झाले का? इतरांचे पालक नाहीत का? त्यावेळेच्या ब्रम्हणांनी राज्यभिषेकाला विरोध केला त्यांचे कसे काय पालक होऊ शकतात? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार यांच्यावर आरोप होतोय तर मग छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राम्हण प्रतिपालक का म्हटले जायचे. शिवाजी महाराज ब्रामह्णांचे पालक असु शकतात, गाईचेकसे? ही विशेषणे कोणी दिली ? असे प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केले आहे.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य उभारणीत सर्व जाती- जमातींच्या लोकांचे सहाय्य होते. तानाजी मालुसरे कुणबी होते, शिवा काशीद असे अनेकजण होते.

मग गोब्राम्हण प्रतिपालक असे का म्हटले गेले ? मी सर्व ब्राम्हण जातीबद्दल बोलत नाही. महात्मा फुलेंना त्याच्या कार्यात सहकार्य करणारे देखील अनेक ब्राम्हण होते असं भुजबळ यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि आता छगन भुजबळ यांनी केलेले हे विधान सध्या राज्यात चर्चेचा विषय होत असून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.