मुंबईः अनिल परबच्या डोक्यात मस्ती गेलीय, हवा गेलीय. त्याचे पाय जमिनीवर नाहीत. मी त्याला पत्रात हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असा शब्द उद्विग्न झालेले आमदार आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना शनिवारी दिला.
ज्येष्ठांना मंत्रिपद दिलं नाही…
आमदार व माजी मंत्री रामदास कदम म्हणाले की, आमचं वय झालं. ७० वर्ष ओलांडले. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलंय. उद्धव ठाकरे म्हणाले नक्की. मी म्हटलं हो साहेब, पण जेव्हा मंत्र्यांची लिस्ट पाहिली. तेव्हा त्यात सुभाष देसाईंचं नाव पाहिलं. तेव्हा वाईट वाटलं. दुःख झालं. मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून नाही तर ज्येष्ठांना मंत्रिपद दिलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
परबांनी शपथ भंग केली…
कदम म्हणाले की, या पुढे आमदारांना निधी देणार नाही, असे परब म्हणतात. अनिल परबच्या बापाचा पैसा आहे का, तू शपथ घेतली त्याचा भंग केला. मी बघेन. उद्धवजींना विचारून घे. तो जिल्हा नियोजन निधीचा पैसा आहे. तुझा नाही. आमदारांचा हक्क आहे. तो निधी मिळाला नाही तर मी कोर्टात जाईल. अनिल परब तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण, असा सवालही त्यांनी केला.
पुढचा निर्णय ठरवणार…
रामदास कदम म्हणाले, पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेणार. माझी मुलं आणि समर्थकांसोबत चर्चा करू. लवकरच पत्रकार परिषद घेऊ. अन्याय सहन करण्याला मर्यादा असतात. नगर परिषदेच्या निवडणुकाचा निकाल लागल्यावर निर्णय घेऊ. उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात मस्ती गेलीय. हवा गेली. त्याचे पाय जमिनीवर नाहीत. मी त्याला पत्रात हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.
शिवसेनेतून बाहेर पडणार नाही…
कदम म्हणाले, मी शिवसेनेतून कदापी बाहेर पडणार नाही. मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. माझ्या मुलाच्या भवितव्याची चिंता आहे. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. माझ्या मुलांचं करिअर आता सुरू झालं आहे. त्यावरच घाव घातला जात आहे. पक्षातून काढलं तरी शिवसैनिक म्हणून जगेन. अनिल परब हेच पक्षप्रमुख आहेत. त्यांच्याविरोधात बोललो तर पक्षाच्या विरोधात बोललो असंच आहे. एक महिन्याच्या आत येऊन तुमच्याशी संवाद साधेल, असेही ते म्हणाले.
Ramdas Kadam: भगव्याची साथ सोडणार का? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत? काय म्हणाले रामदास कदम?