महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पूर्ण झालं आहे. मतदानानंतर आता वेगवेगळ्या संस्थेचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. काही एक्झिट पोलमध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकासआघाडी दोघांमध्ये कांटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. इलेक्टोरल एजनुसार, राज्यात महाविकास आघाडीला 150 जागा मिळू शकतात. तर भाजपसोबत महायुतीला 118 जागा मिळू शकतात. 20 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत.
SAS एक्झिट पोल काय सांगतो?
- आणखी एका एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाल्याचे दिसत आहे. SAS च्या मते, राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला 127 ते 135 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीला 147-155 जागा मिळू शकतात. इतरांना 10-13 जागा मिळताना दिसत आहेत.
- MATRIZE च्या एक्झिट पोलनुसार महायुती सरकार बनवू शकते. महायुतीला 150-170, MVA 110-130 आणि इतरांना 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
- चाणक्य रणनीतीनुसार, महायुतीला महाराष्ट्रात 152 ते 160 जागा मिळू शकतात आणि एमव्हीए आघाडीला 130 ते 138 जागा मिळू शकतात. इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
- पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील, एमव्हीए आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज आहे.
- पी-मार्कच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचेही सरकार स्थापन होऊ शकते. महायुतीला 137 ते 157 जागा मिळतील, एमव्हीए आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील, तर इतरांना 2 ते 8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
- पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार, महायुतीला महाराष्ट्रात 150 ते 170 जागा मिळतील, MVA आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 08 ते 10 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.