मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय (Maharashtra) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेश (Suprime court) सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर, आता राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Election) निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा असा आदेशच सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील 15 ते 18 महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. शिवसेना राज्यातील महापालिका निवडणुका या महाविकास आघआडी म्हणून एकत्र लढण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या बुधवारच्या बैठकीतही हाच सर आळवण्यात आला.
राज्यातील मुंबई, ठाण्यासह काही महापालिका शिवसेना सहज जिंकू शकेल. असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याच्या व्यतिरिक्त पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर यासारख्या महापालिकाही ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढण्याची गरज असल्याचे राऊत यांनी सांगितले. याबाबत महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये हा विचार असून लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेची याबाबत आधीच तयारी सुरु होती, मात्र आता त्याला वेग येईल असेही त्यांनी सांगितले आहे. विरोधकांनी कितीही मुद्दे उपस्थित केले किंवा पोलखोल यात्रा केल्या तरी त्याचा शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर काहीही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकारी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची चर्चा झाली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीच्या स्वरुपात निवडणुका लढववाव्यात असा सूर बैठकीत व्यक्त झाल्याचे बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. याबाबत लवकरचत आघाडीतील नेत्यांशी चर्चा होईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारच्या वतीने याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकणूच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीत एकत्र लढाव्यात, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची इच्छा आहे. आता यात काँग्रेस काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर सातत्याने नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार व्यक्त केला आहे. तर भाई जगताप यांनीही हीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना काँग्रेस किती खीळ घालणार, की शेवटच्या क्षणापर्यंत हे भिजत घोंगडे पडणार, हे पाहावे लागणार आहे.