सुन्न करणारी घटना, लाडकी बहीण योजनेसाठीची धडपड जीवावर, कागदपत्रे बनवायला गेला आणि…

| Updated on: Jul 05, 2024 | 7:03 PM

लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. राज्यभरातील महिला तहसील कार्यालयांवर जावून कागदपत्रांची जुळावजुळव करत आहेत. यासाठी महिलांना त्यांचे पतीदेखील मदत करत आहेत. पण अशाच एका महिलेला मदत करणाऱ्या पतीचा कागजपत्रांची जुळवाजुळव करत असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेननंतर महिलांनी तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढला.

सुन्न करणारी घटना, लाडकी बहीण योजनेसाठीची धडपड जीवावर, कागदपत्रे बनवायला गेला आणि...
सुन्न करणारी घटना, लाडकी बहीण योजनेसाठीची धडपड जीवावर
Follow us on

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली. ही योजना फार चांगली असली तरी मात्र अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू देण्यात यावे, अशा अनेक मागण्या घेऊन अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख मोर्चा काढला. या योजनेच्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. वयोमर्यादा वाळवावी, टॅक्स पावतीची अट रद्द करावी, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू स्थापन करावं, अशी मागणी करून आंदोलकांनी आपल्या सरकारला घरच्या आहेर दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्ता किरण कांबळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. या मोर्चा निघण्यामागील कारणही तसंच आहे.

नेमकं काय घडलं?

गोंदिया जिल्ह्यात अनेक सेतू केंद्रावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रात पत्रासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अशातच या योजनेसाठी पुरुषांना देखील या योजनेसाठी महिलांना मदत करावी लागत आहे. तर विविध साहित्यासाठी पुरुषांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना अर्जुनी मोरगाव येथे घडली. कागदपत्र आणत असताना एका महिलेचा पती अपघातात मरण पावला. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिलांनी या योजनेमधील कागदपत्रांची अट शिथिल करावी आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी केली. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू केंद्र उघडावे, घर टॅक्स पावती अनिवार्य करू नये अशा विविध मागण्यांना घेऊन महिलांनी मुक मोर्चा अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयावर काढला.

महिला कार्यकर्त्यांचं रस्त्यावर उतरुन आंदोलन

या योजनेची मुदत वाढ करावी, अशी मागणी या महिलेने केली आहे. कारण गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसामुळे रोवणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे 31 ऑगस्टची तारीख समोर वाढवावी, अशी मागणी महिलांद्वारा करण्यात आली. याकरिता चक्क अजित पार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निवेदन दिले. आता शासन कोणती भूमिका घेते? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.