अण्णाभाऊ साठेंचे घाटकोपरमध्ये मोठे स्मारक, लवकरच कामाला सुरुवात होणार : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Jun 30, 2021 | 7:09 PM

आव्हाड यांनी चिराग नगरमध्ये लवकरच अण्णाभाऊ साठे यांचे मोठे स्मारक बांधण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले. तसेच कुठेतरी सुरुवात करावी म्हणून चिराग नगरमधील घराला भेट दिल्याचे आव्हाड म्हणाले.

अण्णाभाऊ साठेंचे घाटकोपरमध्ये मोठे स्मारक, लवकरच कामाला सुरुवात होणार : जितेंद्र आव्हाड
ANNABHAU SATHE
Follow us on

मुंबई : घाटकोपरमधल्या अण्णाभाऊ साठे वास्तव्यास असलेल्या चिराग नगरमधील घराला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी घरात असलेल्या स्मारकाची पाहाणी केली. त्यानंतर आव्हाड यांनी चिराग नगरमध्ये लवकरच अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचे मोठे स्मारक बांधण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले. तसेच कुठेतरी सुरुवात करावी म्हणून चिराग नगरमधील घराला भेट दिल्याचे आव्हाड म्हणाले.(work of Annabhau Sathe Ghatkopar Chirag Nagar memorial will start soon said Jitendra Awhad)

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लवकरच काम सुरु होणार

“कोरोनामुळे काही करता आले नाही. मात्र, आता कुठे तरी सुरुवात करावी म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या चिराग नगरमधील घराला भेट दिली. चिराग नगरमध्ये लवकरच अण्णाभाऊ साठे यांचे मोठे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरु होईल,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आंबेडकरांना गुरु मानत जागतिक दर्जाच्या साहित्याची निर्मिती केली

तसेच पुढे बोलताना त्यांनी “चिराग नगर अण्णाभाऊंची कर्मभूमी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान त्यांनी डफावर हात मारत उभी चळवळी पेटवली. शिक्षण न घेता आंबेडकरांना गुरु मानत जागतिक दर्जाच्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली. जातीयवादाच्या विषाविरोधात त्यांची प्रचंड आक्रमक भूमिका होती.”

कुठे तरी सुरुवात करावी म्हणून इथे आलो

“त्यांचे एखादे स्मारक तयार व्हावे अशी घोषणा मी सरकार आल्यावेळी केली होती. कोरोनामुळे काही करता आलं नाही. मात्र आता कुठे तरी सुरुवात करावी म्हणून इथे आलो आहे. यासंदर्भातला आराखडा पुन्हा उलगडून काम सुरु करण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असे आव्हाड यांनी सांगितले.

पवार-ठाकरे यांच्या बैठकीत मिही होतो, गृहनिर्माण प्रकल्पांबाबत चर्चा झाली

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीसंदर्भात सुरु असलेल्या चर्चा तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीबाबत वक्तव्य केले. सीबीआयला इतक्या खालच्या स्तरावर नेणं हे 70 वर्षात कधी झालं नव्हतं. एखाद्या संघटनेचं कार्यालयासारखं जर होणार असेल तर जनमाणसाला समजतं हे काय सुरु आहे. ठाकरे आणि पवार यांच्यात बैठक झाली. यामध्ये गृहनिर्माण प्रकल्प तसेच अनेक विषयांवर चर्चा झाली. मीही त्या बैठकीला उपस्थित होतो. प्रकल्प शीघ्र गतीनं पुढे कसे न्यावे ? यासंदर्भात चर्चा करुन आम्ही ते ठरवलं. माझ्यासमोर बैठक झाली त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद नाहीत,” असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.

इतर बातम्या :

बुलडाण्यात एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिवीरचे डोस, लाईफलाईन हॉस्पिटल सील

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातही भाजप आक्रमक राहणार, भाजपच्या बैठकीत काय रणनिती ठरली?

‘त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार’, मलिकांचा भाजपला इशारा

(work of Annabhau Sathe Ghatkopar Chirag Nagar memorial will start soon said Jitendra Awhad)