विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : लॉकडाऊनमुळे व्यावसायिक हताश झाले आहेत. लहान व्यावसायिकांवर तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एक लहान व्यावसायिक हातठेल्यावरून मास्क विक्रीच्या आडून लहानसहान स्टेशनरीचे साहित्य विक्री करत होता. या हातगाडी चालकावर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मास्क व्यतिरिक्त अन्य साहित्यावर विक्रीस निर्बंध असल्याचे या हातगाडेवाल्याला पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, तो हातगाडीचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पथकाने त्याही हातगाडी तहसील कार्यालयात जमा केली. यावेळेत संतप्त हातगाडी चालक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला (Yavatmal small businessman protest after administration action against him).
पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला
यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. काही लोक त्याला चिथावणी देत होते. तर काही या घटनेचा व्हिडीओ बनवत होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने समोरील अनर्थ टळला. दरम्यान, याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शासनाचा आदेश पाळून कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही बरोबर आहे. पण पोटाची आग शमविण्यासाठी कष्टाने व्यवसाय करणाऱ्यांचीही काय चूक? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ नेमकं काय?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संबंधित व्यावसायिक प्रशासनाच्या गाडीच्या पुढच्या दोन्ही चाकांच्या अगदी खाली झोपला आहे. यावेळी एक महिलादेखील तिथे आहे. ही महिला देखील रस्त्यावर खाली बसते. यावेळी पोलीस दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार घडत असताना परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती (Yavatmal small businessman protest after administration action against him).
व्हिडीओ बघा :
मास्कच्या नावाने स्टेशनरी सामान विकतो, प्रशासनाची कारवाई, हवालदिल हातगाडीचालक थेट गाडीखाली झोपला #Yavatmal #Lockdown pic.twitter.com/bJgJ4yj2Vj
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) June 3, 2021