यवतमाळ : शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांना शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला आहे. शेततळाच्या गाळात फसल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला आहे. आकाश राजेंद्र दुतकोर (15) आणि चेतन सुरेश मसराम (15) अशी या दोन मृत मुलांची नावं आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
यवतमाळमधील बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द शेतशिवारातील एक शेतकऱ्याच्या शेतात शेतपिकाला खत टाकण्यासाठी काही शाळकरी मुल गेली होते. या मुलांची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे आई-वडिलांना आधार मिळावा यासाठी ही मुलं शेतात खत टाकण्यासाठी गेले होती. काम संपवून घरी परतत असताना त्यांना पाण्याने भरलेले शेततळे दिसले. यानंतर त्या मुलांपैकी दोघांना पोहण्याचा नाद आवरला नाही.
परिसरात हळहळ
यानंतर त्या दोघांनी थेट शेततळात उडी घेतली. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे हे दोघे त्यात अलगद अडकले. शेततळ्यात उडी मारलेले दोघेजण बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने इतर मुलांनी नांदुरा खुर्द ग्रामस्थांना याची माहिती दिली. यानंतर नांदुरा ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
त्यानंतर शेततळात बुडालेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाल्याने फार उशिर झाला होता. दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
VIDEO : Mumbai | मुंबईत 50 हजार नागरिक दरडीच्या छायेत, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहितीhttps://t.co/zZCW1tbnAh#Mumbai #Landslides #SureshKakani
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
(Yavatmal two school children death during While swimming in ponds)
संबंधित बातम्या :
VIDEO | कासाडी नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू, मृतदेहांचा शोध सुरु
मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही पावसाचा कहर, 12 तासात 200.88 मिमी पाऊस