यवतमाळ : जिल्ह्यातील वणीतील रामनवमीत वेगळंच चित्र दिसलं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. रामनवमी समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया (Vijay Chordia) यांनी स्वतः भगवे (Saffron) वस्त्र परिधान केले होते. कार्यकर्तेही भगवे वस्त्रात होते. तुम्ही म्हणाय यात काय विशेष. विशेष म्हणजे विजय चोरडिया यांनी आपल्या घरच्या कुत्र्यालाही भगवे वस्त्र (Clothing) परिधान करून दिले होते. रॅलीत ढोलताशे वाजत होते. जोरदार आवाज येते होता. चोरडिया यांच्या घरचा कुत्रा आपली शेपटी हलवित होता. गाण्याच्या तालावर दुडूदुडू चालत होता. जणू काही रॅलीमध्ये नाचत होता. जीभ बाहेर काढून उन्हापासून थंड होण्यासाठी शितली प्राणायम जणू करत होता. रॅलीत सहभागी झालेल्या कुत्र्याचा पट्टा विजय चोरडिया यांनी काढून टाकला. त्यामुळं तो बिनधास्त होता. विशेष म्हणजे कुत्र्याच्या गळ्याचा पट्टाची भगव्या रंगाचा होता.
विजय चोरडिया हे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच ते रामनवमी समितीचे अध्यक्ष आहेत. रॅलीत वणीमध्ये चक्क आपल्या घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करून शोभा यात्रेला आणले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. राज्यात हिंदुत्वावरुन राजकारण पेटत असताना भाजपच्या नेत्याने घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र घालून यात्रेत आणून नेमका काय संदेश दिला. हा सवाल उपस्थित केला जातोय. त्यांच्या अशा पद्धतीची वागणुकीवर टीका केली जात आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यातून चोरडिया यांना कोणता संदेश द्यायचाय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
वणीतील रामनवमीच्या रॅलीमध्ये विजय चोरडिया यांनी घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करून आणले होते. pic.twitter.com/aLumpduTe2
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 15, 2022