गाव-खेड्यातल्या महिला लखपती होणार, मोदींची यवतमाळमध्ये मोठी घोषणा

| Updated on: Feb 28, 2024 | 7:53 PM

"मोदीने गावाच्या बहिणींना लखपती दीदी बनण्याची गॅरंटी दिली आहे. आतापर्यंत देशाच्या 1 कोटी बहिणी लखपती बनल्या आहेत. यावर्षाच्या बजेटमध्ये आम्ही घोषणा केली आहे की, 3 कोटी बहिणींना लखपती बनवायचं आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गाव-खेड्यातल्या महिला लखपती होणार, मोदींची यवतमाळमध्ये मोठी घोषणा
Follow us on

यवतमाळ | 29 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महिला बचत गटाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या हस्ते आज हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात महिलांना लखपती करण्याच्या योजनेबाबत भाष्य केलं. “मोदीने गावाच्या बहिणींना लखपती दीदी बनण्याची गॅरंटी दिली आहे. आतापर्यंत देशाच्या 1 कोटी बहिणी लखपती बनल्या आहेत. यावर्षाच्या बजेटमध्ये आम्ही घोषणा केली आहे की, 3 कोटी बहिणींना लखपती बनवायचं आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“आता संकल्पच्या सिद्धीसाठी मी काम करत आहे. बहिणी आणि मुलींची संख्या 10 कोटींच्या पार गेली आहे. या महिलांना बँकेकडून 8 लाख कोटी रुपये दिले गेले आहेत. 40 हजार कोटी रुपयांचा फंड केंद्र सरकारने दिला आहे. महाराष्ट्रातही बचत गटाशी संबंधित महिलांना याचा फायदा झालाय. आजही 800 कोटींपेक्षा जास्त रुपयांची मदत दिली गेली आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

“यवतमाळच्या बघिणींनी अनेक ई-रिक्षा देण्यात आलं आहे. मी महाराष्ट्र सरकारचं या कामासाठी विशेष अभिनंदन करतोय. महिला आता ड्रोनही चालवतील. नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून बघिणींच्या समुहांना ड्रोन पायलटची ट्रेनिंग दिली जात आहे. मग सरकार या महिलांना ड्रोन देईल ज्याचा वापर शेतीच्या कामासाठी होईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पावर मोदींचं भाष्य

“मोदीने आणखी एक गॅरंटी देशाच्या शेतकऱ्यांना दिली होती. काँग्रेस सरकारने कित्येक दशक देशातील 100 मोठ्या सिंचन योजनांना लटकावून ठेवलं होतं. यापैकी 60 पेक्षा जास्त पूर्ण झाले होते. लटकलेल्या योजनांमध्ये महाराष्ट्राच्या 26 योजना होत्या. महाराष्ट्राच्या जनतेला हे जाणण्याचा अधिकार आहे की, कुणाच्या पापाची शिक्षा तुमच्या पिढ्यांना भोगावं लागलं आहे. या 26 लटकलेल्या योजनांपैकी 12 पूर्ण झाले आहेत. तर इतरांवरही जोरात काम सुरु आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

“हे भाजपचं सरकार आहे ज्याने 50 वर्षांनी पूर्ण करुन दाखवलं आहे. कृष्ण-कोयना लिफ्ट सिंचन योजना, टेंभू लिफ्ट सिंचन योजना अनेक दशकांनी पूर्ण झालंय. गोसीखुर्द सिंचन योजना आमच्या सरकारनेच पूर्ण केलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आज पीएम कृषी सिंचन आणि बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत 51 प्रकल्पांचं लोकार्पण होईल. यातून 80 हजार पेक्षा जास्त हेक्टर जागेला सिंचनाची सुविधा मिळेल”, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.