यवतमाळ : राज ठाकरेंची (Raj Thackeray) सभा औरंगाबादेत जरी होणार असली तरी या सभेने राज्याचे राजकारण ढवळून निघालंय. या सभेला एकीकडून जोरदार विरोध होतोय, तर दुसरीकडून समर्थनही मिळत आहे. भाजप नेत्यांचा सूर या सभेच्या बाजुनेच आहे. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या सभेच्या मर्यादेवरून पुन्हा शिवसेनेला टोलेबाजी केली आहे. या सभेची मर्यादा तोडण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) लोक घुसतील आणि पुन्हा लोकांची मर्यादा तोडल्याच्या तक्रारी दाखल करतील अशी शंका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे. तसेच सामनावरही मुनगंटीवारांनी सडकडून टीका केली आहे. दैनिक सामना हे वर्तमानपत्र कायद्या खाली रजिस्टर जरी असले तरी ते शिवसेनेचे पॉम्पलेट आहे, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना खासदार संजय राऊत यावर जोरदार पलटवार करण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी पंधरा हजार मर्यादा घालून दिली आहे, त्याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, कोणी सभेला यावं हे विचित्र कथा आहे. अजब सरकारची गजब कहाणी आहे. जेव्हा सभा घेतो सभेला तेव्हा आपण निमंत्रण पत्रिका पाठवत नाही. एखद्या थेटरची तिकीट काढतो. तसे नाही. उद्या हा नियम मोडायला सभेत शिवसैनिक जातील आणि वरून आरोप की आम्ही जो नियम घातला, तो मोडला गुन्हा दाखल करा. असे कधी असते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
तर परवानगी देताना तुम्ही शब्दांबाबात बोलू शकता, भाषणाची परवानगी, स्वातंत्र्यांचा अपवाद आहे. त्याबद्दल बोलले पाहिजे. पण 15 हजार लोकांना परवानगी हे कोणाच्या हातात आहे? कोण येईल हे सांगू शकतो का?, हे सरकार विचित्र विरहाचे सरकार आहे. या ठिकाणी राजकारणाचा निम्न स्थर सुरू आहे, अशी टीकाही मुनगंटीवर यांनी केली आहे. तसेच. 28 नोव्हेंबर हा विश्वासघात दिवस करावा लागेल , 28 नोव्हेंबर 2019 ला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रतारणा करत, शिवसेना काँग्रेससोबत गेली. मात्र बाळासाहेब सांगायचे काँग्रेससोबत गेल्यास दुकान बंद करेल, असा टोलाही मुनगंटीवीरांनी शिवसेनेला लगावला आहे.
सामना या वृत्तपत्रावर टीका करताना मुनगंटीवर म्हणाले. या पॉम्पलेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक काढणे ही त्यांची सवय जडली आहे. त्याचे व्यसन आहे. व्यसनाला काय उत्तर आहे? जगभर या देशाचा कौतुक करताना मोदींच्या सन्मानeर्थ गौरव होतो. ज्या शब्दाचा उपयोग होतो. या देशाच्या लोकांना त्याचा अभिमान आहे, मात्र मुंबईच्या शिवसेनेच्या एका पॉम्पलेटमध्ये जागा नसेल त्यावर भाष्य करणे प्रतिक्रिया करणे आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.