आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय सांगायचंय?

| Updated on: Oct 14, 2022 | 8:48 PM

जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्याच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ.

आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय सांगायचंय?
प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
Follow us on

विवेक गावंडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज यवतमाळात होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अंधेरीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्याने त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे कोणी पाठिंबा मागितला नाही. सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार इलेक्शन आयोगाला दिले त्याचा काय होऊ शकतं. याची जंत्री मी लोकांसमोर मांडली होती, याची आठवण प्रकाश आंबेडकर यांनी करून दिली.

प्रकाश आंबेडकर युतीबाबत म्हणाले, पहिलं प्राध्यान्य कोणाला हा विषय नाही. आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर बोलल्या होत्या की, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करू. या भूमिकेला कोणी प्रतिसाद दिला नाही, हे स्पष्टपणे सांगतो. जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्याच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ.

प्रकाश आंबेडकर हे प्रा. साईबाबा यांच्या सुटकेबाबत म्हणाले, सरकारं प्रतिबंधात्मक अटक कायद्याचा गैरवापर करीत आहे. त्यामुळं प्रोफेसर साईबाबा यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे. सरकारच्या या थेअरीला सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट बळी पडले नाही. याचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रिव्हेन्शन डिटेन्शन ऍक्टचा सरसकट वापर केला जात आहे. दुर्दैवाने एक टक्केही लोकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली नाही. त्यामुळे या कायद्याचा अंदाधुंद गैरवापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले, असेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, एसटीच्या लुटीच्या संदर्भात एसटीचे अधिकारी कर्मचारी बोलत नाहीत. स्वतःच्या पगाराबद्दलचं बोलतात. त्यामुळे ते सुद्धा चोर आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांवर केली.