यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथे एका तरुणीवर गावातीलच एका तरुणामे चाकूने प्राणघातला हल्ला केल्याची धक्कादायत घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपीने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्ना केला. त्याच्यावरही यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे (Youth attack on girl due to one way love in Yavatmal).
संबंधित तरुणी ही आपल्या मैत्रिणींसह शेतात गेली होती. तिचा पाठलाग करत आरोपी चिंतामण पुसनाके हा तरुणदेखील शेतात गेला. दुसऱ्या व्यक्तीशी कसं लग्न करते? असं म्हणत या तरुणाने मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये मुलीच्या पोटात चाकू घुसला. यावेळी तिच्या सोबतच्या मैत्रिणींनी आरडाओरड केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज पीडित मुलींच्या काकांना ऐकू गेला.
काका धावत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. त्यानंतर त्यांनी जखमी अवस्थेत तरुणीला खांद्यावर उचलून 500 मीटरपर्यंत आणले. त्यानंतर दुचाकीच्या साहाय्याने तिला घाटंडी रुग्णालयात दाखल केले. घाटंजी पोलिसांनी तातडीने याप्रकरणी कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला (Youth attack on girl due to one way love in Yavatmal).
विशेष म्हणजे आरोपीने तरुणीवर चाकू हल्ला केल्यावर तो घटनास्थळवरून पळून गेला. त्याने काही वेळाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घाटंजी पोलीसांना आरोपी गवसला. त्यांनी आरोपी चिंतामण पुसनाके याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. सध्या तरुणी आणि आरोपी हे दोघेही यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.
हेही वाचा :
शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
अमेरिकेतून काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये, 11 वीतील विद्यार्थी 17 व्या मजल्यावरुन कोसळला