Zeeshan Siddique: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली होती. त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर लॉरेन्स बिश्नाई गँगच्या शूटरने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी जिशान सिद्दिकी कार्यालयातच थांबल्यामुळे ते बचावले. या प्रकरणानंतर झिशान सिद्दिकी यांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. परंतु त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक सापडली आहे. पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या सुरक्षेची अकस्मात पडताळणी केली. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेला सुरक्षा रक्षक कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळले. आता त्याचे निलंबन करण्यात आले आहे.
खेरवाडी परिसरात बाबा सिद्धिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून करण्यात हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतरही मुलगा झिशान सिद्दिकीची सुरक्षा अजूनही टांगणीला असल्याचे या प्रकरणानंतर दिसत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात झिशानने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी अकस्मात पडताळणी केली असता सुरक्षा रक्षक अनुपस्थित असल्याचे आढळून आला. यामुळे त्याचे निलंबन करण्यात आले.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांचा पोलीस सुरक्षा रक्षक असलेले श्याम सोनवणे याचे निलंबन करण्यात आले होते. आता झिशानच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस सुरक्षा रक्षकाचे निलंबन करण्यात आले. कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने पोलीस सुरक्षा रक्षक विशाल ठाणगे याला निलंबित करण्यात आले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर दुसऱ्या पोलीस अंमलदाराचे निलंबन झाले आहे.
झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना वांद्र पूर्व विधानसभा मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे. आपल्या कठीण काळात विश्वास दाखवल्याबद्दल झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले होते. आता निवडणूक प्रचारात व्यस्त असताना त्यांच्या सुरक्षेत्रील त्रूटी समोर आली आहे.