Budget Expectations | ऑटो क्षेत्राला मिळावा दिलासा, विकासाच्या दृष्टीने पाऊल उचला, मर्सिडीज-बेंझच्या काय आहेत अपेक्षा?

| Updated on: Jan 29, 2022 | 11:11 AM

येणाऱ्या अर्थसंकल्पातून प्रत्येक क्षेत्राला काही ना काही अपेक्षा आहे, कारण की गेल्या वर्षापासून उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्राची आर्थिक घडी विस्कटली आहे.

Budget Expectations | ऑटो क्षेत्राला मिळावा दिलासा, विकासाच्या दृष्टीने पाऊल उचला, मर्सिडीज-बेंझच्या काय आहेत अपेक्षा?
Auto industry
Follow us on

नवी दिल्ली : काही दिवसातच अर्थमंत्री( finance minister) निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. येणाऱ्या अर्थसंकल्पातून प्रत्येक क्षेत्राला काही ना काही अपेक्षा आहे, कारण की गेल्या वर्षापासून उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या (corona situation) परिस्थितीचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्राची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामध्ये ऑटो क्षेत्र (Auto industry) काही निराळे नाही. या क्षेत्रात सुद्धा अनेक चढ उतार झाले आहेत आणि याचा थेट परिणाम या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध घटक त्यात कार निर्माते असू दे, कामगार असू दे,कच्चा माल पुरवणारे विक्रेते या सर्वांना आर्थिक फटका बसला आहे.अशातच भारताच्या विकासासाठी ऑटोक्षेत्राने देखील काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. . कंपनीने 2021 मध्ये 11,242 युनिट्सची किरकोळ विक्री केली, 2020 मध्ये 7,893 युनिट्सपेक्षा 42.5 टक्क्यांनी वाढ झाली. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी असे वक्तव्य केले आहे की, “जर स्थिर रणनीती आणि या ऑटोक्षेत्रासाठी स्पष्ट आराखडा आखला सोबतच उद्योगाला प्रगतीशील पथावर नेण्यासाठी ई-मोबिलिटी युगात झपाट्याने प्रवेश करून वेगवान विकास साधला जाऊ शकतो तरच भारतीय ऑटो उद्योगाला भविष्यात आपण जागतिक नकाशावर आणू शकतो.”

कर रचनेत बदल करावा

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये ऑटो उद्योगासाठी येणारा अर्थ संकल्प हे विकासाच्या दृष्टीने असावा. या अर्थ संकल्पात दीर्घकालीन योजना स्वीकारून त्यात वाढ करावी आणि त्या अनुषंगाने भविष्यात पाऊल उचलणारे उद्दिष्ट असले पाहिजे. रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, नवीनतम तंत्रज्ञानाची ओळख आणि डेकार्बोनायझेशनचे वाढलेले प्रयत्न याला प्राधान्य दिले पाहिजे, असे लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ इंडियाने शुक्रवारी सांगितले. पुणे शहर हे असे शहर आहे ,जेथे अनेक मोठ मोठ्या ऑटो कंपनीने आपला व्यवसाय मोठया डौलारा सांभाळत आहेत. ऑटोमेकरन यांनी सध्याच्या स्थितीत जी टॅक्स रचना आहेत त्यात बदल करण्याची देखील मागणी केली आहे.

विशिष्ट बदल करणे अनिवार्य

श्वेंक यांच्या मते, सध्याची जी टॅक्स रचना पद्धती आहे जर त्या पद्धतीवर योग्य विचार करून टॅक्स मध्ये आवश्यक ते बदल केले गेल्यास ग्राहक, निर्यात प्रमोशन, थेट रोजगार निर्मिती आणि डिजिटायझेशनला योग्य सकारात्मतेने चालना देण्यासाठी काही विशिष्ट बदल करणे अनिवार्य आहे, तरच या क्षेत्रात अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सतत सरकारी खर्च केल्याने प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची मागणी आणखी वाढेल, असेही ही मत श्वेंक यांनी मांडले. या महिन्याच्या सुरुवातीला श्वेंकने यांनी म्हंटले होते की , दिवसेंदिवस किंमतीत होणारी उच्च वाढ ही भारतातील लक्झरी कार उद्योगाच्या वाढीस अडथळा ठरत आहे आणि यामुळे अनेक विपरीत परिणाम या क्षेत्राला भोगावे देखील लागत आहे.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?