डिसेंबर महिन्यात निर्यातीत 37 टक्क्यांची वाढ; एप्रिलपर्यंत 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणार!

| Updated on: Jan 04, 2022 | 6:15 AM

निर्यातदारांसाठी खूशखबर आहे. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये निर्यातीत तब्बल 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह गेल्या एका महिन्यात 37.29 अब्ज डॉलरची निर्णयात झाली. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्यातीने 300 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे.

डिसेंबर महिन्यात निर्यातीत 37 टक्क्यांची वाढ; एप्रिलपर्यंत 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणार!
Follow us on

नवी दिल्ली: निर्यातदारांसाठी खूशखबर आहे. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये निर्यातीत (Exports) तब्बल 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह गेल्या एका महिन्यात 37.29 अब्ज डॉलरची निर्णयात झाली. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्यातीने 300 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहिमध्ये निर्यातीत विशेष तेजी दिसून आली. तिसऱ्या तिमाहिमध्ये 103 अब्ज डॉलरची निर्यात झाली. दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत निर्यात 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.

निर्यातीची मासिक आकडेवारी जाहीर

सोमवारी व्यापार व वाणिज्य मंत्रालयाकडून निर्यातीसंदर्भातील मासिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यामध्ये निर्यातीत तब्बल 37 टक्क्यांची वाढ झाली असून, एका महिन्यात निर्यातीने 37.29 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक निर्यात झाली आहे. दरम्यान हळूहळू निर्यात वाढत असून, निर्यातीला प्रोहत्साहन देण्यासाठी केंद्राकडून अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

निर्यात 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

हळूहळू आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत आहोत. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्याचा उद्योगधंद्यांवर सकारात्मक परिणाम होताना दिसत असून, सर्व काही सुरळीत राहिल्यास आपण चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडू असे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले. कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे वस्तू आणि उत्पादनाच्या पुरवठ्यची साखळी खंडीत झाली होती. परिणामी उत्पादन देखील घटले होते. मात्र आता पुन्हा एकदा जग पुर्वपदावर येत असून, भविष्यात निर्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?

असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

Public Provident Fund: गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न