Gold-Silver Price Today: अर्थसंकल्पानंतर सोने झाले स्वस्त, चांदीचा देखील घसरला भाव , नेमकी गोल्ड-सिल्वर बाजार भावात काय झाली उलथा – पालथ

| Updated on: Feb 02, 2022 | 7:27 PM

इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स एसोसिएशनची अधिकृत वेबसाइट, ibjarates.com जाहीर केलेल्या अपडेट नुसार ,02 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्राफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

Gold-Silver Price Today: अर्थसंकल्पानंतर सोने झाले स्वस्त, चांदीचा देखील घसरला भाव , नेमकी गोल्ड-सिल्वर बाजार भावात काय झाली उलथा - पालथ
सोन्याचे दर
Follow us on

Gold-Silver Price Latest Updates Today 2 Feb:  भारतीय सर्राफा बाजार हे सोने चांदीचे माहेर घर मानले जाते.या बाजारात मोठ्या प्रमाणात सोने चांदीची विक्री खरेदी केली जाते परंतु या बाजारात आपल्याला केंद्रिय अर्थसंकल्प जाहीर केल्यावर सोने – चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. या सप्ताहच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी आज रोजी दिनांक 02 फरवरी 2022 सकाळी सोने स्वस्त झाले तर चांदीचा भाव सुद्धा घसरला.  इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स एसोसिएशन (IBJA)च्या अधिकृत वेबसाइट वर केले गेलेल्या अपडेट माहितीनुसार सर्राफा बाजार मध्ये 02 फेब्रुवारी सकाळी 999 शुद्धता असणारे 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate)प्रति 10 ग्रॅमवर 246 रुपये स्वस्त झाले असून 48008 रुपये इतका झाला आहे त्याचबरोबर चांदी (Silver Price) सुद्धा मंगळवारच्या संध्याकाळी तुलनेत 235 रुपये प्रति किलो स्वस्त झाले असून 999 शुद्धता असणाऱ्या चांदीचा भाव 61375 रुपये प्रति किलो पोहचला आहे ,ज्या चांदीची दिवसाला किंमत 61610 रुपये एवढी होती

Gold and Silver Rate: सोने-चांदीचे हल्लीचे भाव

_   शुद्धता बुधवार सकाळी
किंमत
सोने (प्रति 10 ग्रॅम) 999 48008
सोने (प्रति 10 ग्रॅम) 995  47816
सोने (प्रति 10 ग्रॅम) 916  43975
सोने (प्रति 10 ग्रॅम) 750  36006
सोने (प्रति 10 ग्रॅम) 585  28085
चांदी (प्रति 1 किलो) 999  61375

Sone Chandi ka Bhav:  मंगळवारी सोने चांदीचा नेमका भाव काय होता …

इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स एसोसिएशन (India Bullion And Jewellers Association) यांच्या मते, मंगळवारी सकाळच्या तुलनेमध्ये संध्याकाळी सोने-चांदीच्या भावांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळाली. IBJA नुसार 999 शुद्धता असणारे 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 47976 रुपये एवढा होता, जो भाव संध्याकाळी 48254 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला.
चांदीचा भाव देखील किंमत 61610 रुपये प्रति किलोने वाढला होता तसेच बुधवारी सकाळी पुन्हा सोने – चांदीच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.

अशाप्रकारे चेक करा सोने-चांदीचा सध्याचा असलेला भाव…

आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय सरकार सार्वजनिक सुट्टी जाहिर करतात अशा दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी ibja द्वारा सोने चांदीचे भाव जाहीर केले जात नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव माहिती करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या नंबरवर मिस कॉल देऊ शकतात.काही वेळातच तुम्हाला एसएमएसच्या द्वारे सोने चांदीच्या भावाबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल याशिवाय सातत्याने सोने-चांदीचे भावाबद्दल अपडेट मिळवण्यासाठी www.ibja.co किंवा ibjarates.com अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही क्षणा क्षणाला अपडेट होणारी माहिती प्राप्त करू शकता.

इंडियन बुलियन ज्वेलर्स एसोसिएशन (Indian Bullion Jewelers Association) च्या वतीने वेगवेगळ्या शुद्धतेचे असलेले सोने-चांदी याबद्दलची माहिती दिली जाते. हे सगळे चार्जेस टॅक्स आणि मेकिंग चार्ज आधीचे आहेत. IBJA च्या वतीने जाहीर केलेले सोने चांदीचे भाव जगभरामध्ये सर्वमान्य असतात परंतु यांच्या किमती मध्ये जीएसटीचा समावेश केलेला असतो आपल्या सांगू इच्छितो की, सोने-चांदीचे जेव्हा आपण दागिने घेत असतो त्यावेळी सोन्या चांदीच्या भावात यांची टॅक्स किंमत समाविष्ट केलेली असते म्हणून आपल्याला सोने चांदीचा भाव जास्त वाटू लागतो.

Pune crime|भाडेतत्वार महिंद्रा XUV कार घेऊन पळाले ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

होमलोन घेणाऱ्यांच्या संख्येत भर! HDFCच्या नफ्यात 11% वाढ, आर्थिक तिमाही अहवाल जाहीर

Nitesh Rane Arrest : भाजप नितेश राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे का? मुनगंटीवार म्हणतात, वेट एन्ड वॉच!