नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक नागरिकांनी स्टेट बँकेत (State Bank) आपले बचत खाते उघडले आहे. बँकेत खाते उघडण्यावर ग्राहकांना एकाधिक लाभ प्राप्त होतात. स्टेट बँकेच्या बचत खातेधारकांना (Savings Account) मिळणारे लाभ जाणून घेऊया. स्टेट बँकेच्या बचत खाते धारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा थेट लाभ प्राप्त होईल. तुम्हाला अद्याप याबाबत माहिती नसल्यास स्टेट बँकेद्वारे प्रदान करण्यात आलेले लाभ जाणून घ्या. तसेच तुम्ही नेमका कसा लाभ प्राप्त कराल याबद्दलही माहिती घ्या. तुम्हाला लाभ प्राप्त करण्यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल.
स्टेट बँक आॕफ इंडियाद्वारे सर्व जनधन खातेधारकांना 2 लाख रुपयांचा मोफत इन्श्युरन्स प्रदान केला जातो. तुम्ही 2 लाख रुपयांचा इन्श्युरन्स प्राप्त करु इच्छित असल्यास तुम्हाला एसबीआयमधील बचत खाते जनधन खात्यामध्ये हस्तांतरित करावे लागेल. तुम्ही यानंतरच योजनेचा लाभ घेऊ शकतात. अनुदान आणि इतर योजनांचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरित होत असल्यामुळे भ्रष्टाचाराला कमी वाव मिळतो. केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे घोषित आपत्कालीन स्थितीत अर्थसहाय्य थेट जनधन खात्यात वर्ग केले जाते.
केंद्र सरकारने वर्ष 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेला आरंभ केला होता. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना आर्थिक सेवा, बचत खाते, निवृत्तीवेतन किंवा अन्य सुविधा पोहचविणे आहे. जनधन खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही किमान शिल्लक शून्य रुपये देखील ठेऊ शकतात. अन्य बँकांच्या बचत खात्यात किमान 500 ते 1000 रुपये ठेवावे लागतात.
जनधन खातेधारकांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. यासोबतच जनधन खातेधारकांना अन्य सुविधाही प्राप्त होतात. तुम्हाला दोन लाखांचे विमा उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी खाते हस्तांतरित करावे लागेल. जर तुम्हाला जनधन योजनेअंतर्गत तुमचे खाते उघडायचे असल्यास तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. तुम्ही जवळच्या सरकारी बँक किंवा खासगी बँकेत जाऊन जनधन योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. जनधनसाठी ऑनलाईन खाते उघडण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्हाला त्यासाठी फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक ठरते. हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये फॉर्म उपलब्ध असतो.
इतर बातम्या :