मुंबईः महाराष्ट्रातील सोने गुंतवणुकदारांसाठी सलग चौथा दिवस भाववाढीचा ठरला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) भाववाढ दिसून आली. नाशिक व पुण्यानं सोन्याच्या भावात आघाडी घेतली. दोन्ही शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 400 रुपयांची भाववाढ (Inflation) नोंदविली गेली. राजधानी मुंबईत आज (गुरुवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ नोंदविली गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याच्या भावाच्या आलेखात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या भावातील पडझड सावरल्याचं चित्र दिसून आलं. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49970 व 22 कॅरेट सोन्याला 45800 रुपये भाव मिळाला.
देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव…
• मुंबई- 49970 रुपये (रु.280 वाढ)
• पुणे- 49900 रुपये (रु 390 वाढ)
• नागपूर- 49900 रुपये (रु.210 वाढ)
• नाशिक- 49900 रुपये (रु.390 वाढ)
• मुंबई- 45,800 रुपये (रु 250 वाढ)
• पुणे- 45,760 रुपये(रु 400 वाढ)
• नागपूर- 45760 रुपये(रु.210 वाढ)
• नाशिक- 45,760 रुपये (रु.400 वाढ)
तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.