नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) मौल्यवान धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. राजधानी दिल्लीत आज (बुधवारी) सोन्याच्या भावात (Gold Rate) 228 रुपयांनी वाढ नोंदविली गेली. प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,584 रुपयांवरुन 46,812 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव (Silver Rate) 271 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 59,932 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भावात किंचित वाढ नोंदविली गेली. सोन्याला 1,818 प्रति औंस भाव मिळाला आणि चांदीचा भाव 22.70 प्रति औंसवर स्थिर राहिला.
आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 350 रुपयांची वाढ झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 48,590 वरुन 48,940 वर पोहोचला.
• 12 जानेवारी: 48590/ प्रति तोळे
• 11 जानेवारी :48,590/प्रति तोळे
• 10 जानेवारी :48,610/प्रति तोळे
• 09 जानेवारी :48,610 /प्रति तोळे
• 08 जानेवारी :48,600/प्रति तोळे
पुण्यात देखील सोन्याच्या भावात दोन अंकी वाढ नोंदविली गेली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 290 रुपयांची वाढ झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 48,340 वरुन 48,630 वर पोहोचला.
• जानेवारी 12 : 48630/प्रति तोळे
• जानेवारी 11 :48,340 /प्रति तोळे
• जानेवारी 10 :48,350/प्रति तोळे
• जानेवारी 9 :48,350/ प्रति तोळे
• जानेवारी 8 :48,340/प्रति तोळे
उपराजधानी नागपूरमध्ये सोन्याच्या भावात वाढ नोंदविली गेली. काल (मंगळवार) पेक्षा सोन्याचा भाव 350 रुपयांनी वधारला. प्रति तोळा सोन्याचा भाव 46,590 रुपयांवरुन 46,940 वर पोहोचला.
नाशिकमध्ये सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. काल (मंगळवार) पेक्षा सोन्याचा भाव 280 रुपयांनी वधारला. प्रति तोळा सोन्याचा भाव 45,840 रुपयांवरुन 46,120 वर पोहोचला.
कोरोनाच्या काळात तर सोने खरेदी ही उत्तम गुंतवणूक मानली गेली. सोन्याच्या भावात नित्यनियमाने चढउतार झालेले पाहायला मिळतात. दरम्यान, सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात. सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स लागत असतात. जर आपण सोने खरेदीच्या 36 महिन्यांअगोदर सोने विक्रीला काढले तर शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो आणि खरेदीच्या 36 महिन्यांनंतर सोने विक्री करताना लॉन्ग टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो.
दोन्ही रितीने कॅपिटल्स गेन टॅक्सचं कॅलक्युलेशन वेगवेगळ्या प्रकारे असते. जर खरेदीच्या 36 महिन्यांच्याअगोदर सोने विक्रीला काढले तर कॅपिटल्स गेन टॅक्स आपल्या मूळ किमतीवर जोडला जातो. आपण ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येता त्याच्यानुसार आपल्याला टॅक्स चुकवावा लागतो. जर तुम्ही खरेदीच्या 36 महिन्यांच्या नंतर विक्री करत असाल तर त्यावर 20 टक्के टॅक्स लागतो. त्यावर सरचार्ज आणि एज्युकेशन सेस देखील लागतो. पाठीमागच्या सादर झालेल्या बजेटमध्ये LTCG वर सेस 3 टक्क्यांवरुन 4 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे ज्यामुळे आता LTCG वर 20.80 टक्के इतका टॅक्स लागतो.
जर कॅपिटल गेनऐवजी कॅपिटल लॉस झाला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढ्या किमतीला आपण सोने खरेदी केले तेवढ्याच किमतीला आपल्या सोन्याची विक्री झाली तर टॅक्समध्येही आपल्याला सूट मिळते. भारतीय संस्कृतीत सोने शुभ मानले जाते. अनेक जण आपल्या प्रियजणांना सोने गिफ्ट स्वरुपातही देतात. एका आर्थिक वर्षात गिफ्टच्या रुपात 50 हजार रुपयांपर्यंतच्या गोल्ड गिफ्टवर टॅक्स लागत नाही.
इतर बातम्या :