डिजिटल अर्थभरारी: ‘क्रिप्टो’च्या वापरात युवकांसोबत महिलांची आघाडी, ‘या’ शहरात सर्वाधिक इन्व्हेस्टर!

| Updated on: Jan 02, 2022 | 6:36 AM

क्रिप्टो करन्सी डिजिटल कॕश प्रणाली मानली जाते.खासगी संगणकांच्या चेनसोबत संलग्नित आहे आणि अल्गोरिदमवर आधारित आहे. यावर कोणतेही राष्ट्र किंवा सरकारचे नियंत्रण नसते. क्रिप्टो व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक राष्ट्रांनी कायदेशीर दर्जा बहाल केला आहे. क्रिप्टोकरन्सी खरेदीचे दोन मार्ग आहेत. मात्र, क्रिप्टो एक्स्चेंज द्वारे खरेदी सर्वात लोकप्रिय मार्ग ठरत आहे

डिजिटल अर्थभरारी: क्रिप्टोच्या वापरात युवकांसोबत महिलांची आघाडी, या शहरात सर्वाधिक इन्व्हेस्टर!
डिजिटल चलनावर केंद्राची वक्रदृष्टी, एप्रिल अखरेच्या क्रिप्टो व्यवहारांवर करसक्ती
Follow us on

नवी दिल्ली- डिजिटल गुंतवणुकीत अग्रेसर मानल्या जाणाऱ्या ‘क्रिप्टोकरन्सी’त भारतीयांनी आघाडी घेतली आहे. युवक, महिलांसोबत ज्येष्ठ नागरिक क्रिप्टोकडे आकर्षित झाले आहेत. भारतातील क्रिप्टो गुंतवणुकदारांचा आकडेवारी मांडणारा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. देशातील सर्वात बलाढ्य क्रिप्टो एक्स्चेंज ‘वजीरएक्स’ने त्यांच्या ट्रेंडिंग वॉल्यूममध्ये 1735 टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा केला आहे. तर क्वाईन स्विच कुबेरने 3500 टक्क्यांनी ट्रेंडिंग वॉल्यूम वाढल्याचे म्हटले आहे.

‘क्वाईनस्विच’वर 1.4 कोटी यूजर:

क्रिप्टो एक्स्चेंज कॉईनस्विच कुबेरने नुकतीच ताजी आकडेवारी प्रकाशित केली आहे. त्यानुसार भारतात 1.4 कोटी यूजर असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी 60 टक्के यूजरचे वय 28 वर्षापेक्षा कमी आहे. अहवालातून समोर आलेली महत्वाची बाब म्हणजे 15 टक्के क्रिप्टो गुंतवणूकदार महिला आहेत.युवकांसोबतच महिलांमध्येही क्रिप्टोचे आकर्षण वाढीस लागले आहे. महिला क्रिफ्टो व्यवहारात अधिक सक्रिय असल्याचे अहवालात म्हटले आहे.

‘या’ शहरात अधिक गुंतवणूकदार :

अहवालानुसार, दिल्ली,कोलकत्ता, पुणे, मुंबई, लखनौ आणि पाटण्यात क्रिप्टोचे प्रारंभीचे गुंतवणूकदार आहेत. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे यूजर्स क्रिप्टोच्या व्यवहारात आघाडीत घेत आहेत. यावर्षात तब्बल 1 कोटी 40 लाख नागरिकांनी क्वाईन स्विच कुबेर प्लॕटफाॕर्मचा क्रिप्टो अॕसेटची खरेदी,विक्री, ट्रेडिंग याबाबतची माहिती प्राप्त करण्यासाठी वापर केला. वापरकर्त्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे व्यवहारांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविली गेली. यंदाच्या वर्षात ही वाढ 3500 टक्क्यांहून अधिक होती.

भारतातील सर्वात मोठे मानले जाणाऱ्या क्रिप्टो एक्स्चेंच वजीरएक्सच्या व्यवहारांत 1700 पटींनी वाढ झाली आहे. ट्रेडिंगचा आकार 43 अरब डॉलरच्या स्तरावर पोहोचला आहे. एका वर्षाच्या आत क्रिप्टो खरेदी व विक्रीचे व्यवहार पार पडले. वर्ष 2020 च्या तुलनेत क्रिप्टो व्यवहारांत सर्वोच्च वाढ नोंदविली गेली.

क्रिप्टो करन्सी व्यवहार:

क्रिप्टो करन्सी डिजिटल कॕश प्रणाली मानली जाते.खासगी संगणकांच्या चेनसोबत संलग्नित आहे आणि अल्गोरिदमवर आधारित आहे. यावर कोणतेही राष्ट्र किंवा सरकारचे नियंत्रण नसते. क्रिप्टो व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक राष्ट्रांनी कायदेशीर दर्जा बहाल केला आहे. क्रिप्टोकरन्सी खरेदीचे दोन मार्ग आहेत. मात्र, क्रिप्टो एक्स्चेंज द्वारे खरेदी सर्वात लोकप्रिय मार्ग ठरत आहे. जगभरात शेकडो क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजचे काम करत आहे. भारताचा विचार केल्यास वजीरएक्स, जेबपे, क्वाईनस्विच कुबेर, क्वाईनडीसीएक्स गो सहित अनेक एक्स्चेंज समाविष्ट आहेत. ज्याद्वारे बिटकॉईन, इथेरियम, टेथर आणि डॉजक्वाईन सहित जगभरातील अन्य डिजिटल करन्सी खरेदी केली जाऊ शकते.

इतर बातम्या :

Megablock | 24 तास महा-मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

2021 मध्ये शेअर बाजारामधून चांगला परतावा; गुंतवणूकदार झाले मालामाल, चालू वर्षातील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञांचं मत काय?

Paush Amavasya 2022 | आज वर्षातील पहिली अमावस्या, जाणून घ्या महत्त्व, पूजेची पद्धत, शुभ वेळ