वाराणसी: आज तब्बल 108 वर्षांनंतर काशीतील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे. काशी विश्वनाथ धाममध्ये शिव प्रांगणात अन्नपूर्ण्नेची स्थापना झाली आसून ही प्राचीन मूर्ती कॅनडातून भारतात आण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आज एकादशीच्या मुहूर्तावर देवोत्थान काशीधाममध्ये आणलेल्या अन्नपूर्णेश्वरीच्या मूर्तीसह पाच देवतांची प्रतिष्ठापना झाली.
#WATCH | Chief Minister Yogi Adityanath installs Maa Annapurna Devi’s idol at Kashi Vishwanath Temple, in Varanasi. pic.twitter.com/69ZyUsFddQ
— ANI UP (@ANINewsUP) November 15, 2021
Chief Minister Yogi Adityanath performs rituals to install Maa Annapurna Devi’s idol at Kashi Vishwanath Temple, in Varanasi.
The idol was retrieved from Canada, recently. pic.twitter.com/emaowopI45
— ANI UP (@ANINewsUP) November 15, 2021
आसे मानले जाते की, बाबा विश्वनाथांनी काशीसह संपूर्ण जगाचे पोट भरण्यासाठीच माता अन्नपूर्णेकडे भिक्षा मागितली होती. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की एक शतकापूर्वी भारतातून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची प्राचीन मूर्ती कॅनडातून परत आण्यात येणार आहे.
वाळूच्या दगडापासून बनवलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती 18 व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. अन्नपूर्णाचीही मूर्ती कॅनडातील रेजिना विद्यापीठात असलेल्या मॅकेन्झी आर्ट गॅलरीच्या संग्रहालयात ठेवलेली होती. 2019 मध्ये, भारतीय वंशाच्या कलाकार दिव्या मेहरा यांनी अन्नपूर्णाची मूर्ती पाहिली. जेव्हा त्यांनी नोंदी तपासल्या तेव्हा असे आढळून आले की 1913 मध्ये वाराणसीतील गंगेच्या काठावर असलेल्या मंदिरातून अशीच एक मूर्ती गायब झाली होती. त्यानंतरच मूर्ती भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
हे ही वाचा