चव्हाण, भुजबळांसह अनेक खासदार, मुख्यमंत्र्यांवर मनी लॉन्ड्रिंगचे खटले; ईडीची सुप्रीम कोर्टात यादी; यादीत आणखी कोण?

| Updated on: Aug 10, 2021 | 12:14 PM

122 राजकारण्यांची नावे असलेल्या या यादीत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नावे आहेत. या यादीत अनेक राज्यांचे आजीमाजी मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांचीही नावे आहेत. (122 sitting, ex-legislators facing laundering cases, ED tells SC)

चव्हाण, भुजबळांसह अनेक खासदार, मुख्यमंत्र्यांवर मनी लॉन्ड्रिंगचे खटले; ईडीची सुप्रीम कोर्टात यादी; यादीत आणखी कोण?
supreme court
Follow us on

नवी दिल्ली: देशात कुणाकुणावर मनी लॉन्ड्रिंगचे खटले सुरू आहेत याची एक यादी ईडीने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. 122 राजकारण्यांची नावे असलेल्या या यादीत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नावे आहेत. या यादीत अनेक राज्यांचे आजीमाजी मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांचीही नावे आहेत. (122 sitting, ex-legislators facing laundering cases, ED tells SC)

‘टिव्ही9 भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, या यादीत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची नावे आहेत. शिवाय भाजपच्याही नेत्यांची नावे आहेत. ईडीने सर्वोच्च न्यायालयाला ही यादी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंगचे खटले सुरू असलेल्या नेत्यांच्या या यादीत ए. राजा आणि कनिमोझी यांची नावे सर्वात वर आहेत. 2010मद्ये टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. याप्रकरणी ए राजा आणि कनिमोझी यांच्यावर सीबीआयने आरोपपत्रं दाखल केलं होतं. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण उघड झालं होतं. त्यानंतर दोघांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर सीबीआयने दिल्ली कोर्टात अपील केलं होतं. त्यावरील निर्णय अजून प्रलंबित आहे.

चिदंबरम यांचे नावही

या यादीत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात 2012मधील एअरसेल मॅक्सिस व्यवहारप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2017मध्ये मीडियातील एफडीआयच्या मंजुरीप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता. या यादीत अनेक माजी मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. भाजपचे बीएस येडियुरप्पा, काँग्रेसचे बीएस हुड्डा, दिवंगत वीरभद्रा सिंह, ओ इबोबी सिंह, गेगोंग अपांग, काँग्रेसचे नबाम तुकी, ओपी चौटाला (ट्रायल पूर्ण), एनसीपीचे चर्चिल अलेमाओ, काँग्रेसचे दिगंबर कामत आणि अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.

अमरिंदर सिंह आणि जनगमोहन रेड्डी

भाजपचे शुभेंदू अधिकारी, तृणमूलचे मुकुल रॉय, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, वाय. एस. जगनमोहन रेड्डी, अमरिंदर सिंह यांची नावेही या यादीत आहेत. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि जगनमोहन रेड्डी या मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही यात समावेश आहे. तसेच या यादीत झामुमोचे माजी आमदार सीता सोरेन, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, काँग्रेसचे डीके शिवकुमार, लालूप्रसाद यावद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव, तृणमूलचे मदन मित्रा, सुब्रत मुखर्जी, सोवन चटर्जी आणि श्यामपदा मुखर्जी यांचीही नावे आहेत. (122 sitting, ex-legislators facing laundering cases, ED tells SC)

 

संबंधित बातम्या:

‘ती’ भेट टाळता आली असती, केंद्रीय भाजप नेत्यांचे चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष निर्देश?

पेगाससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली?; राष्ट्रवादीचा केंद्राला सवाल

फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत, त्यांचा वकिली सल्लाही घेऊ; संजय राऊतांचा टोला

(122 sitting, ex-legislators facing laundering cases, ED tells SC)