श्रीनगर : यावर्षी जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 171 दहशतवादी मारले गेल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या वर्षी एकूण 171 दहशतवादी चकमकीमध्ये ठार झाले. त्यापैकी 19 दहशतवादी हे पाकिस्तानी तर 152 स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. 2020 ला जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये एकूण 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2021 ला एकूण 34 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, या वर्षी जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय जवांना मोठे यश मिळाले आहे. जवळपास सर्वच दहशतवादी गंटांच्या मोहरक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. त्यामधे उत्तर काश्मीरमध्ये 65, मध्य काश्मीरमध्ये 16 आणि दक्षिण काश्मीरमध्ये 87 एसे एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. 13 डिसेंबर रोजी झालेल्या झेवान दहशतवादी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पोलिसांचे दहशतवाद्यांकडे बारीक लक्ष असून, राज्यातील दहशतवादी कारवायांना आळा घालण्याला आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
दरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये सध्या अमली पदार्थ्यांच्या तस्करीचे प्रकरणे वाढले असल्याची माहिती देखील यावेळी विजय कुमार यांनी दिली. अमली पदार्थ्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना राबवत आहोत. आतापर्यंत अमली पदार्थ तस्करी प्रकरणात 815 एफआयआर दाखल करण्यात आल्या असून, एकूण 1465 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
A total of 171 terrorists were killed this year, out of them 19 were Pakistani terrorists, 152 local terrorists. Last year 37 civilians were killed but this year 34 civilians have been killed: IGP Kashmir, Vijay Kumar pic.twitter.com/sc3rCNcmOV
— ANI (@ANI) December 31, 2021
लहान मुलं कोव्हिडच्या विळख्यात, प्रत्येक जिल्हात हवं स्वतंत्र रुग्णालय, 81% भारतीयांची मागणी