मुंबई : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज मुंबईमध्ये निधन झाले. झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 वर्षी शेवटचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांना मुंबईमधील कँडी ब्रीच रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि थोड्यावेळाने त्यांना मृत (Dead) घोषित केले. राकेश झुनझुनवाला हे सर्वात यशस्वी भारतीय गुंतवणूकदारांमध्येपैकी एक होते. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाच्या बातमीने व्यापारी जगताला मोठा धक्का बसलायं. राकेश झुनझुनवाला यांनी काही काळापूर्वी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट (Dream Project) अकासा एअरलाइन्स सुरू करून विमान वाहतूक व्यवसायात प्रवेश केला.
दिग्गज स्टॉक ट्रेडर राकेश झुनझुनवाला यांचे विमान वाहतूक व्यवसायात उतरण्याचे स्वप्न पूर्ण झाले पण काही स्वप्ने अपूर्ण राहिली. राकेश झुनझुनवाला यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना आपल्या काही महत्वाची स्वप्ने बोलून दाखवली होती. राकेश झुनझुनवाला यांना त्यांच्या मुंबईत नवीन घर बांधल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांना विचारण्यात आले होते की, मुंबईत त्यांच्य़ा नवीन घराच्या पहिल्याच दिवशी ते जगातील कोणत्या तीन लोकांना जेवायला बोलवतील? यावर झुनझुनवाला यांनी खास उत्तर दिले होते.
राकेश झुनझुनवाला यांनी जी तीन नावे घेतली त्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही नाव होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकन गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना त्यांच्या नवीन घरी पहिल्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करायचे होते. राकेश झुनझुनवाला यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 2018 मध्येच निधन झाले. योगायोगाने अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. आता राकेश झुनझुनवाला यांनीही ऑगस्ट महिन्यातच जगाचा निरोप घेतला.
राकेश झुनझुनवाला पुढे बोलताना म्हणाले की, शेअर ट्रेडिंगमधून निवृत्त झाल्यानंतर मला पोहायला जायचे आहे. मला नृत्य शिकायचे आहे आणि माझ्या आवडीचे आयुष्य जगायचे आहे. राकेश झुनझुनवाला नियमित योगासने करायचे. रविवारी सकाळी राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या मध्यवर्ती भागातील कँडी ब्रीच रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राकेश झुनझुनवाला यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक केली जातंय.