केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केले की, या महिन्यात राज्यांना खर्चासाठी 47,541 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. त्या म्हणाल्या, “राज्यांना 47,541 कोटी रुपयांची सामान्य रक्कम देण्याऐवजी, 22 नोव्हेंबर रोजी एक महिन्याचा आगाऊ हप्ताही दिला जाईल. अशा प्रकारे, त्या दिवशी राज्यांना एकूण 95,082 कोटी रुपये दिले जातील. त्या म्हणाले की एक महिन्याचा आगाऊ हप्ता मिळाल्याने, राज्यांना भांडवली खर्चासाठी अतिरिक्त निधी मिळेल, ज्याचा वापर ते पायाभूत सुविधांच्या उभारण्यासाठी होईल.”
This is being done in consideration of the desire for states to have money in their hands, to help infrastructure creation expenditure: FM @nsitharaman @FinMinIndia @DDNewslive @airnewsalerts @PIB_India https://t.co/I7j8cxcI4W
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) November 15, 2021
निर्मला सीतारामन यांनी सोमवारी कोविड महामारीनंतरच्या आर्थिक सुधारणांच्या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत 15 राज्यांचे मुख्यमंत्री, तीन राज्यांचे उपमुख्यमंत्री, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री आणि इतर राज्यांचे अर्थमंत्री सहभागी झाले होते.
हे ही वाचा