चैन्नई- इथोपियातून आलेल्या एका विमान प्रवाशाकडून ( Air passenger)9.590 किलो वजनाचे कोकेन (cocaine)आणि हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. चैन्नई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या अंमली पदार्थांची किंमत बाजारात 100 कोटी (100 Crores)रुपये सांगण्यात येत आहे. चैन्नई विमानतळाची स्थापना 1932 साली करण्यात आली होती, त्यानंतर 100 कोटी ड्रग्ज सापडण्याची ही या विमानतळावरील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते आहे. अदिस अबाबाहून आलेल्या इक्बाल बी उरंदडी या 38 वर्षीय भारतीय प्रवाशाकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हवाई गुप्तचर युनिटचे अधिकारी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल कुमार यांच्या माहितीवरुन इथोपियावरुन येणाऱ्या विमानातील प्रवाशांची चौकशी करण्यात आली.
Based on intelligence by AIU officer Anil Kumar, an Indian passenger Iqbal B Urandadi who arrived from Addis Ababa, by Ethiopian Airlines on August 11 was intercepted by AIU officers. Seizure of heroin & cocaine weighing 9.590 kgs valued at Rs 100 crores done: Chennai Air Customs pic.twitter.com/NacdeJmYsn
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) August 12, 2022
साधारणपणे अफ्रिकेतून येणाऱ्या कोणत्यातरी व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांना होती. मात्र ज्यावेळी इक्बाल या भारतीय प्रवाशाची तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सीमा शुल्क अधिकाऱ्यांचा संशय त्याच्याबाबतचा बळावला. त्यानंचर त्याची सखोल चौकशी आणि तपासणी केल्यानंतर त्याच्याकडून सपमारे 100 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ११ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आल्याचे चैन्नई विमानचतळावरुन काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इक्बाल याच्या बॅगची तपासणी करण्यात आली, तसेत त्याच्या पायातील शूजचीही तपासणी करण्यात आली. त्यात हे साडे नऊ किलोचे कोकेन आणि हेरॉईन अधिकाऱ्यांना सापडले आहे. त्यानंतर इक्बाल याला ताब्यात घेण्यात आले असून एनडीपीएस कायद्यानुसार हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. आता मुश्ताक याच्या चौकशीत या सगळ्या अमली पदार्थांमागील मास्टरमाईंडचे नाव शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे.
जुलैमध्ये एका टांझानियन प्रवाशाकडून 8.86 कोटी रुपयांचे हेरॉईन चैन्नई विमानतळावरच जप्त करण्यात आले होत. त्यानंतर आता ऑगस्टमध्ये ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. युगांडातून आलेल्या या प्रवाशाकडून कॅप्युल्समध्ये भरलेले हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या प्रवाशाकडून 86 कॅप्स्युल्स जप्त करण्यात आल्या होत्या. त्यात 1.26 किलोचे 8.86 कोटींचे हेरॉईन होते. जूनमध्येही चैन्नई विमानतळावर मोबाईलमध्ये लपवून स्मगलिंगसाठी आणलेले 24 लाखांचे सोने जप्त करण्यात आले होते.