न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल, तलवारऐवजी आता हातात संविधान

| Updated on: Oct 16, 2024 | 8:47 PM

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या सूचनेवरुन न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत. न्यायदेवतेच्या हातात आधी तलवार होती. पण हे हिंसेचे प्रतीक आहे, असे सीजेआयचे मत आहे त्यामुळे, न्यायालये हिंसाचाराद्वारे न्याय देत नाहीत तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. म्हणून दुसऱ्या हातातील तलवार ऐवजी हातात संविधान देण्यात आले आहे.

न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल, तलवारऐवजी आता हातात संविधान
Follow us on

चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती. एका हातात तराजू होता आणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातात संविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.

CJI ने हा निर्णय का घेतला?

CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

तलवार हिंसा आणि तराजू समानतेचे प्रतीक

तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, असे सीजेआय यांचे मत होते. तर, न्यायालये हिंसाचाराद्वारे न्याय देत नाहीत तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. त्यामुळे दुसऱ्या हातात तलवार ऐवजी संविधान असावे जो प्रत्येकाला समान न्याय देतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या सूचनेनुसार न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आली आहे. सर्वप्रथम जजेस लायब्ररीमध्ये मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. येथे न्यायदेवतेचे डोळे उघडे आहेत आणि पट्टी नाही, तर तिच्या डाव्या हातात तलवारीऐवजी संविधान आहे. उजव्या हाताला पूर्वीप्रमाणेच तराजू आहे.

न्यायदेवतेची मूर्ती भारतात कोठून आली?

न्यायाची देवी ही एक प्राचीन ग्रीक देवी आहे, जी न्यायाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. तिचे नाव जस्टीया आहे. तिच्या नावावरून न्याय हा शब्द तयार झाला. या देवीच्या डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीचाही खोल अर्थ आहे. डोळ्यावर पट्टी बांधली जाणे म्हणजे न्यायदेवता नेहमी नि:पक्षपातीपणे न्याय देईल. एखाद्याकडे पाहून त्यांना न्याय देणे एका दिशेने जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती.

ब्रिटिश अधिकाऱ्याने हा पुतळा भारतात आणला होता

हा पुतळा ग्रीसमधून ब्रिटनला पोहोचला. १७ व्या शतकात ब्रिटीश अधिकाऱ्याने तो पहिल्यांदा भारतात आणला होता. हा ब्रिटिश अधिकारी कोर्ट ऑफिसर होता. 18 व्या शतकात ब्रिटीश काळात न्याय देवीची मूर्ती सार्वजनिक वापरात आणली गेली. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर आपणही न्यायदेवतेचा स्वीकार केला.