अमृतसर : दिल्लीतील (Delhi) मुंडका परिसरातील आगीची घटना ताजी असतानाच आता अमृतसरच्या गुरुनानक रुग्णालयात आग (Gurunanak Hospital) लागल्याचे समोर आले आहे. तर यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून मात्र अजूनही काही रुग्ण रुग्णालयात अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल (शुक्रवार) दिल्लीतील मुंडका परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. या अपघातात महिलेसह 27 जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर जखमींना ग्रीन कॉरिडॉर बनवून संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आता पंजाबच्या अमृतसरमधून आगीची घटना समोर आल्याने दिल्ली आणि पंजाबमध्ये आप सरकारला प्रश्न विचारले जात आहेत.
#WATCH | Fire broke out in the Guru Nanak Dev Hospital in Amritsar, Punjab. pic.twitter.com/p8ko100hRx
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 14, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या अमृतसर येथील गुरुनानक रुग्णालयात आग लागली. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रुग्ण बाहेर पडू शकलेले नाहीत. तर हॉस्पिटलच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरमधून निघालेली ठिणगी हे आगीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आग इतक्या वेगाने लागली की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळालेली नाही. तर आगीच्यामुळे मोठा गोंधळ माजल्याने रुग्णांमध्ये आरडाओरड सुरू झाली. दरम्यान याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. तेथे अग्निशमन दलाच्या 12 गाड्या पोहचल्या. तर त्यांच्याकडू आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
हॉस्पिटलच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली. प्रथम एका ट्रान्सफॉर्मरला आग लागली, त्यानंतर दुसऱ्याला आग लागल्याचे कळत आहे. तर या आगीचा धूर संपूर्ण रुग्णालयात पसरला. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी नातेवाईकांसह बाहेर रस्त्याकडे धाव घेतली.
रुग्णालयाच्या विविध वॉर्डांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण धावून बाहेर रस्त्यावर जात होते. तर रुग्णांच्या म्हणण्यानुसार, आगीच्या धुरामुळे त्यांना श्वास घेणे ही कठीण झाले होते. परंतु कोणीही त्यांना मदत केली नाही आणि त्यांनी स्वतःहून बाहेर येऊन स्वत: चे प्राण वाचवले.
माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि कॅबिनेट मंत्री हरभजन सिंग पोहोचले. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे कॅबिनेट मंत्री हरभजन सिंग यांनी सांगितले.