जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी.. आता सगळीकडे आधार न्यायची गरज नाही, नवीन ॲपने काम होईल सोपं

| Updated on: Apr 09, 2025 | 11:27 AM

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केलेले आधार कार्ड आजकाल प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक बनले आहे. विमानतळ, हॉटेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी व्हेरिफिकेशन करावे लागते, तिथे सर्वत्र मूळ कार्ड आणि आधार कार्डची प्रत दाखवावी लागते, पण आता असे होणार नाही. यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी एक नवीन आधार मोबाईल ॲप लाँच केले आहे.

जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी.. आता सगळीकडे आधार न्यायची गरज नाही, नवीन ॲपने काम होईल सोपं
आधार ॲप
Follow us on

आजकाल जळी स्थळी, काष्ठी पाषाणी, सगळकीडे आधार कार्ड हे व्हेरिफिकेशनसाठी दाखवावे लागते, नाहीतर त्याची कॉपी तरी द्यावीच लागते. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचं होऊ शकंत.  पण आता याच आधार कार्डबाबत एक नवीन ॲप लाँच करण्यात आलं आहे, जो प्रत्यक्षात वापरकर्त्यांच्या डेटाची गोपनीयता राखेल. आणि त्यामुळे युजर्सना आधार कार्ड किंवा त्याची फोटो कॉपी, झेरॉक्स घेऊन फिरण्याची आवश्यकता राहणार नाही.केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात या नवीन ॲपबद्दल माहिती दिली.

आधार ऑथेंटिकेशनसाठी नवीन ॲप लाँच झाल्यानंतर, युजर्सना हॉटेलपासून विमानतळापर्यंत कुठेही आधार कार्ड किंवा त्याची प्रत घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. हे ॲप सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) त्याची चाचणी करत आहे.

आधार ऑथेंटिकेशन UPI प्रमाणेच असेल सोपं

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X प्लॅटफॉर्मवर (जुने ट्विटर) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे नवीन आधार ॲप कसे काम करते, त्याबद्दल दाखवले आहे. यासोबत त्यांनी एक पोस्ट लिहीली आहे. नवीन आधार ॲप, फेस आयडी ऑथेंटिकेशन व्हाया मोबाईल ॲप. नौ फिजिकल कार्ड, नो फोटोकॉपी असेही त्यांनी नमूद केलं आहे.

यासाठी एक व्हिडीओही आहे. तुम्हाला प्रथम एक क्विक रिस्पॉन्स कोड (QR Code) स्कॅन करावा लागेल, त्यानंतर तेच ॲप सेल्फी कॅमेऱ्याद्वारे तुमचा चेहऱ्याची पडताळणी होईल. मिळालेल्या माहितीनुसार, या ऑथेंटिकेशनमध्ये फक्त आवश्यक असलेले मूलभूत तपशील शेअर केले जातील. सध्या, आधार कार्ड स्कॅन केल्यावर किंवा त्याची प्रत दिल्यावर, आधार कार्डवर छापलेले सर्व तपशील त्या व्यक्ती किंवा एजन्सीपर्यंत पोहोचतील.

 

डेटा सेफ्टीत मदत करेल नवे ॲप

खरं तर, विमानतळासह अनेक ठिकाणी लोकांना त्यांचे आधार कार्ड किंवा त्याची प्रत सोबत ठेवावी लागते. त्यामुळे जर आधार कार्डधारकाने त्या आधार कार्डची प्रत दुसऱ्याला दिली, तर आधार कार्डवर छापलेले सर्व तपशील त्या व्यक्ती किंवा एजन्सीपर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत, इतर कोणतीही व्यक्ती किंवा सायबर फसवणूक करणारा आधारवर छापलेल्या तपशीलांचा गैरवापर करू शकतो आणि तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

नव्या आधार ॲपने काय होणार फायदा ?

नवीन आधार ॲप आल्यानंतर, तुमच्या आधार कार्डची माहिती पूर्णपणे सुरक्षित राहील. यामुळे तुमच्या आधार कार्डशी संबंधित डेटा लीक होणार नाही याची खात्री होईल. नवीन ॲपवरील ऑथेंटिकेशन प्रक्रियेमुळे केवळ त्या व्यक्तीला किंवा एजन्सीला आवश्यक असलेले तपशीलच उपलब्ध होतील याची खात्री होईल.

आधार ॲपमध्ये काय आहे खास ?

नवीन आधार ॲपद्वारे फेस आयडी आणि क्यूआर स्कॅनिंगद्वारे डिजिटल पडताळणी केली जाईल.

नवीन आधार ॲपमुळे युजर्सच्या परवानगीशिवाय डेटा शेअर केला जाणार नाही, (प्रायव्हसी)गोपनीयता वाढेल.

आता व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीची गरज लागणार नाही.

हॉटेल्स आणि विमानतळांवर फोटोकॉपी देण्याची आवश्यकता राहणार नाही. नवीन आधार ॲपसह फसवणूक किंवा एडिटिंगला काहीच वाव उरणार नाही.