चंदीगड: पंजाबमधून राज्यसभेसाठी (Rajya Sabha Candidates) पाच जागांसाठी नामांकन भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या जागांसाठी आम आदमी पार्टीने (AAP) क्रिकेटपटू हरभजन सिंग, पंजाबचे आपचे सह प्रभारी राघव चड्ढा, आयईटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक यांचे नाव जाहीर करणअयात आले आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपने लवली प्रोफेशनल विद्यापीठाचे कुलगुरू अशोक मित्तल (ashok mittal) यांचे नावही राज्यसभेसाठी जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण आतापर्यंत राज्यसभेसाठी अशोक मित्तल यांच्या नावाची चर्चा नव्हती. मात्र, आपने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी अनेकजण पंजाब बाहेरचे असल्याने काँग्रेसने आपवर जोरदार टीका केली आहे. गैरपंजाबी लोकांनी राज्यसभेवर पाठवण्यास आम्ही कडाडून विरोध करू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
आम आदमी पार्टीने पंजाबमधून अशोक मित्तल यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अशोक मित्तल हे लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्यात त्यांचं मोठं योगदान आहे. आम आदमी पार्टीने मित्तल यांचं नाव राज्यसभेसाठी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर पंजाबच्या बाहेरील लोकांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवलं जात असल्याबद्दल विरोधकांनी आपवर टीका केली आहे. राज्यसभेचे उमेदवार पंजाबच्या बाहेरचे असता कामा नये, असं काँग्रेस नेते सुखपाल खैरा यांनी म्हटलं आहे. खैरा यांनी आपच्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी ट्विट केली आहे. या लोकांना तुम्ही राज्यसभेवर पाठवणार असाल तर ते दुर्देवी आहे. हा राज्यासोबतचा भेदभाव असेल. गैर पंजाबी व्यक्तीला राज्यसभा देण्यास आम्ही कडाडून विरोध करू. खरेतर आपचा हा निर्णय म्हणजे आपच्या कार्यकर्त्यांची टर उडवण्याचा प्रकार आहे, असंही खैरा यांनी म्हटलं आहे.
अशोक मित्तल हे पंजाबच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठाचे संस्थापक आहेत. ते देशातील एक यशस्वी उद्योगपती आहेत. भारत-पाक फाळणीनंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले होते. त्यांच्या वडिलांनी जालंधरमध्ये एका मिठाईच्या दुकानापासून व्यवसाय सुरू केला होता. लवली मिठाई म्हणून त्यांची मिठाई प्रसिद्ध होती.
त्यानंतर मित्तल यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील मारूती कारच्या डिलरशीपमध्ये यश मिळवलं. 2001मध्ये त्यांनी संस्था उघडली आणि पंजाब टेक्निकल यूनिव्हर्सिटीशी ती जोडली. एलपीयूला 2005मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाला. पंजाबचे हे पहिले खासगी विद्यापीठ होते. एलपीयू आज 35 देशात 30 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांना माझी विनंती आहे की त्यांनी बीबी खालरा सारख्या लोकांना राज्यसभेचं सदस्य बनवून त्यांचा सन्मान करावा. खालरा हे पोलिसांच्या अत्याचाराचे शिकार झाले आहेत, असं खैरा यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये आपने 117 पैकी 92 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे राज्यातील पाचही राज्यसभेच्या जागेवर आपचे उमेदवार जिंकणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
Aam Aadmi Party to nominate Chancellor of Lovely Professional University, Ashok Mittal to Rajya Sabha, from Punjab
— ANI (@ANI) March 21, 2022
संबंधित बातम्या:
Goa Government Formation: सावंत आले तरी राणे दिल्लीतच, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम?