नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्त्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. सिसोदिया यांनीही या हल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आपच्या या आरोपावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप (BJP) यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून या हल्ल्याचं संपूर्ण खापर भाजपवर फोडलं आहे. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.
भाजप युवा मोर्चाची निदर्शने सुरू होती. त्यावेळी आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर रंग फेकला. या प्रकरणी आम्ही 50 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर जमलेला जमाव पांगवण्यात आला असून आता या परिसरात शांतता असल्याचं दिल्ली नॉर्थ डीसीपींनी सांगितलं.
माननीय मुख्यमंत्री @arvindkejriwal जी के आवास पर भाजपा के गुंडों द्वारा करा गया हमला पंजाब की हार की बौखलाहट को दर्शाता है।
भाजपा वाले इतनी घटिया राजनीति पर उतर गए हैं की पुलिस की मौजूदगी में इन गुंडों ने बैरिकेड तोड़े, सीसीटीवी कैमरा तोड़े। ये बेहद निंदनीय है।#BJPkeGunde pic.twitter.com/3pfKZtZhJe
— Dr. Sandeep Pathak (@SandeepPathak04) March 30, 2022
दरम्यान, केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला नंतर आपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. हे पहिल्यांदाच होत नाही. जेव्हा जेव्हा भाजप निरुत्तर होते, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून असे हल्ले होतात. हा लोकशाहीला धोका आहे. दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाने त्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राय यांनी केली आहे. पंजाबमध्ये भाजपचा पराभव झाला. त्यामुळेच चिडून जाऊन हा हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांच्या समोरच बॅरिकेड तोडण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले. एवढं घाणेरडं राजकारण भाजप करत आहे, अशी टीका संदीप पाठक यांनी केली आहे.
बीजेपी के गुंडे CM @ArvindKejriwal जी के घर पर तोड़फोड़ करते रहे. बीजेपी की पुलिस उन्हें रोकने की जगह उन्हें घर के दरवाज़े तक लेकर आई. https://t.co/oSFc2kWaDC
— Manish Sisodia (@msisodia) March 30, 2022
संबंधित बातम्या:
Nanar Refinery Project : विदर्भात नाणार प्रकल्प नेण्यासाठी काँग्रेस नेता मला भेटला: संजय राऊत
अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले वक्तव्य भाजपला भोवले; दिल्ली विधानसभेतून 3 आमदार निलंबित
महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा