Accident News | कुटुंबाची वेळ आलेली, NH 46 वर भयानक अपघात, कारवर कोसळला ट्रक

| Updated on: Dec 26, 2023 | 12:14 PM

Accident News | एका भयानक रस्ते अपघात झाला राष्ट्रीय महामार्ग 46 वर दुश्यमानता कमी होती. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये 40 टनापेक्षा जास्त भंगार सामान होतं.

Accident News | कुटुंबाची वेळ आलेली, NH 46 वर भयानक अपघात, कारवर कोसळला ट्रक
Truck-Car accident
Follow us on

भोपाळ : धुक्यामुळे अनेकदा भीषण अपघात होतात. त्यात निष्पाप जीवाना आपला प्राण गमवावा लागतो. असाच भयानक अपघात मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले. ओव्हर टेक करताना भंगार सामानाने भरलेला ट्रक कारवर कोसळला. मध्य प्रदेशात गुना येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. त्यावेळी रस्त्यावर दाट धुकं होतं. या अपघातात एक जोडप आणि त्यांच्या दोन मुलींनी प्राण गमावले. ते कुटुंब राजगड जिल्ह्यात राहत होतं. दाट धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 46 वर दुश्यमानता कमी होती. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.

जखमी प्रवाशांना कारमधून बाहेर काढून त्यांना जवळच्या रुग्णालायत नेण्यात आलं असं पोलिसांनी सांगितलं. भंगार सामनाने भरलेला ट्रक कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी ट्रक चालकाच नियंत्रण सुटला आणि ट्रक कारवर पडला.

अपघात इतका भीषण होता की….

ट्रकमध्ये 40 टनापेक्षा जास्त भंगार सामान होतं. हा ट्रक कारवर कोसळता गाडी पूर्णपणे चेपली. कारच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी अपघातीतल जखमी आणि मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. ट्रकमध्ये खूप अवजड सामान होतं. पोलिसांना भंगार हटवण्यासाठी क्रेन आणि जेसीबी मशीनचा आधार घ्यावा लागला. स्र्कॅप हटवल्यानंतरच पोलीस ट्रकला हलवू शकतात. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी येऊन मदत केली.