राहुल अन् इंदिरा गांधी यांची तुलना? कृपया असा मजाक करु नका…कंगना राणावतने नेमके काय म्हटले?

| Updated on: Aug 28, 2024 | 3:53 PM

Kangana Ranaut Emergency release: इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांचा मार्ग वेगवेगळा आहे. एका नेत्याकडे जसे ठोस विचार हवे, तसे विचार राहुल गांधी यांच्याकडे नाही. ते फक्त खुर्चीच्या मागे आहे. त्यासाठी ते आपला मार्ग बदल असतात. इंदिरा गांधी तीन वेळा देशाच्या पंतप्रधान झाल्या.

राहुल अन् इंदिरा गांधी यांची तुलना? कृपया असा मजाक करु नका...कंगना राणावतने नेमके काय म्हटले?
kangana ranaut
Follow us on

भारतीय जनता पक्षाची खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिचा आणीबाणीवर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटाबद्दल खुपच उत्सुक्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर कंगान राणावत हिने राहुल गांधी, इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल मत व्यक्त केले. राहुल अन् इंदिरा गांधी यांची तुलना करण्यास त्यांनी स्पष्ट नकार देत असा मजाक करु नका, असे म्हटले.

राहुल यांच्यासाठी खुर्ची महत्वाची

कंगना राणावत हिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळावर आधारित आहे. त्या पार्श्वभूमीवर कंगना रणावत हिने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. त्यात तिला राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांची तुलना करण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ती म्हणाली की, कृपया देशाची अशी चेष्टा करू नका. हा विनोद करु नका. राहुल गांधी अशी व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी फक्त खुर्ची महत्त्वाची आहे. त्यांना फक्त खुर्चीतच रस आहे. ते त्यांच्या कामात आणि वागण्यात प्रामाणिक नाहीत. त्यांनी राहुलच्या विरोधात आपले मत मांडण्यासाठी Total mess हा इंग्रजी शब्द वापरला.

राहुल गांधींकडे ठोस विचार नाही

कंगना म्हणाली, इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांचा मार्ग वेगवेगळा आहे. एका नेत्याकडे जसे ठोस विचार हवे, तसे विचार राहुल गांधी यांच्याकडे नाही. ते फक्त खुर्चीच्या मागे आहे. त्यासाठी ते आपला मार्ग बदल असतात. इंदिरा गांधी तीन वेळा देशाच्या पंतप्रधान झाल्या. अनेक जण विचार करतात, त्या राहुल गांधी यांच्या आजी होत्या. परंतु त्यांना राहुल गांधींच्या आजी म्हणणे म्हणजे त्यांचे कार्य मर्यादीत करणे आहे. त्या संपूर्ण देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या आमच्या इतिहासाचा एक भाग होत्या. त्यांच्यावर आमचाही तितकाच हक्क आहे.

इंदिरा गांधींना निक्सन बाहेर उभे ठेवत होते

कंगना म्हणाली की, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इंदिरा गांधी बाहेर उभ्या ठेवत असत. परंतु आज आपल्या पंतप्रधानांना किती मान मिळतो, ते पाहा. बरे, तो काळ वेगळा होता. इंदिराजीपेक्षा नेहरू यांचे अमेरिकेत चांगले स्वागत होत होते. या सर्व गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष निक्सन यांनी इंदिराजींना भेटल्यानंतर त्यांच्याबद्दल काय सांगितले. हे जाणून तुमचे मन दुखावले जाईल.