Aditya L1 Video : चंद्रयान – 3 नंतर आता आदित्य एल-1 ने काढला पहिला सेल्फी, पृथ्वी आणि चांदोबाचा अफलातून फोटो काढला

| Updated on: Sep 07, 2023 | 2:41 PM

सुर्याचा प्रवास करायला निघालेले आदित्य एल-1 सुर्याचा दूरवरुन अभ्यास करणार आहे. हे भारताचे पहिलेच सुर्ययान आहे. शनिवारी 2 सप्टेंबर रोजी त्याचे आंध्रातील श्रीहरिकोटा येथून त्याचे लॉंचिंग झाले आहे.

Aditya L1 Video : चंद्रयान - 3 नंतर आता आदित्य एल-1 ने काढला पहिला सेल्फी, पृथ्वी आणि चांदोबाचा अफलातून फोटो काढला
aditya L1 takes a selfie
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान -3 च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी सॉफ्ट लॅंडींगनंतर लॅंडर आणि रोव्हरची अनेक छायाचित्रे पाठविली आहेत. आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने पाठविलेल्या आदित्य एल-1 ने देखील कामगिरी सुरु केली आहे. आदित्यने चांदोबा सोबतचं पृथ्वीचे सुंदर छायाचित्र पाठविले आहे. आदित्य एल-1 ( Aditya L1 ) सुर्याच्या प्रवासाला निघाले असताना आपल्या पृथ्वी आणि चंद्राचा एका फ्रेममध्ये सुंदर फोटो काढला आहे. इस्रोने हा फोटो आपल्या ट्वीटर ( एक्स ) अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

पृथ्वीची दुसऱ्यांदा कक्षा बदलली

आदित्य एल-1 ने ( Adiyta L1 ) आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून रॉकेटच्या सहाय्याने उड्डाण घेतल्यानंतर दोन वेळा पृथ्वीची कक्षा बदलली आहे. आदित्य एल-1 पृथ्वी आणि सुर्याच्या मधील 15 लाख किमी दूरवर असलेल्या एल-1 पॉइंटकडे चालले आहे. आदित्य एल-1 ला त्याचा मुक्काम गाठण्यासाठी 125 दिवस म्हणजे चार महिने लागणार आहेत. आदित्य एल-1 चा सुर्याचा प्रवास पुढे सुरु असून त्याने 245 किमी बाय 22459 किमीच्या कक्षा बदलून आता 282 किमी बाय 40225 किमीचा कक्षा गाठली आहे.

इस्रोने आदित्य एल-1 काढलेला फोटो पोस्ट केला आहे –

आदित्य एल-1 वर सात पेलोड

सुर्याचा प्रवास करायला निघालेले आदित्य एल-1 सुर्याचा दूरवरुन अभ्यास करणार आहे. पृथ्वी आणि सुर्यामधील लॅंग्रेज पॉईंट एल-1 वर आदित्य एल-1 यान निघाले आहे. आदित्य एल-1 वर एकूण सात पेलोड आहेत. या उपकरणाद्वारे सुर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. सुर्याच्या कोरोनाचा अभ्यास केला जाणार आहे. आदित्य एल-1 भारताचे पहिले सौर अभ्यास यान आहे. त्याचे वजन 1480.7 किलोग्रॅम आहे. शनिवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आदित्य एल-1 श्रीहरिकोटातून अवकाशात झेपावले. आदित्य एल-1 वर अगदी सुर्याजवळ जाणार नाही. ते पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर एल-1 पॉईंटवरुन दुरुन निरीक्षण करणार आहे. भारताआधी यापूर्वी अमेरिका, जर्मनी आणि युरोपीय देशांनी सौर मोहिमा राबविल्या आहेत. याआधी 22 सौर मोहिमा झाल्या आहेत.