ADITYA-L1 : सूर्यावरील स्वारीचं काऊंटडाऊन सुरू, काही तासात Aditya L1 लॉन्च होणार; कुठे पाहाल लाइव्ह प्रक्षेपण?

| Updated on: Sep 02, 2023 | 8:17 AM

चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोने महत्त्वाचं मिशन हाती घेतलं आहे. या मिशननुसार भारत सूर्यावर स्वारी करणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या काही तासातच भारताचं हे मिशन सुरू होणार आहे.

ADITYA-L1 : सूर्यावरील स्वारीचं काऊंटडाऊन सुरू, काही तासात Aditya L1 लॉन्च होणार; कुठे पाहाल लाइव्ह प्रक्षेपण?
Aditya L1
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

श्रीहरिकोटा | 2 सप्टेंबर 2023 : चंद्रावरील मिशन यशस्वी झाल्यानंतर आता भारताने मिशन सूर्य हाती घेतलं आहे. भारत आज सूर्यावर जाण्यासाठी एक विशेष यान लॉन्च करणार आहे. ADITYA-L1 हे यान आज अंतराळात झेपावणार आहे. बंगळुरूच्या श्रीहरिकोटा येथून आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी हे यान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. हे यान यशस्वी व्हावं म्हणून इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंदिरात जाऊन पूजाअर्चाही केली आहे. भारताच्या या मिशनकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. चंद्रयानाप्रमाणेच हे मिशनही यशस्वी होणार का? याची जगालाही उत्सुकता लागली आहे.

भारतच नव्हे तर जगासाठी हे मिशन अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक मानलं जात आहे. या मिशनद्वारे सूर्यावरील रहस्य उलगडता येणार आहे. आतापर्यंत सूर्यावरील रहस्य जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. सूर्यावरील तापमानामुळे कोणत्याही देशाने हा प्रयत्न केला नाही. मात्र, भारताने हे धाडस करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी आदित्य लॉन्च करण्यासाठी रिहर्सल्स करण्यात आली होती. त्यानंतर या मिशनचं काऊंटडाऊ सुरू झालं. इस्रो आदित्य एल-1 ला महाकाय रॉकेट पीएसएलव्ही-सी 57च्या माध्यमातून सूर्याच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. सूर्याच्या कक्षेत हे यान जाण्यासाठी 125 दिवस लागणार आहेत.

या ठिकाणी थेट प्रक्षेपण

तुम्हाला जर आदित्य एल1 मिशन लाइव्ह पाहायचं असेल तर तुम्ही TV9 marathiच्या वेबसाईटवर हे प्रक्षेपण लाईव्ह पाहू शकता. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://www.tv9marathi.com/tag/sun

हे सुद्धा वाचा

इस्रोच्या फेसबुकवर पाहा

या मिशनचं लाइव्ह तुम्हाला इस्रोच्या फेसबुक पेजवरही लाईव्ह पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला https://www.facebook.com/ISRO या पेजवर जावं लागणार आहे.

वेबसाईटवरही जा

इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनही तुम्हाला या मिशनचा लाइव्ह आनंद घेता येणार आहे. त्याकरिता  https://www.isro.gov.in/Aditya_L1.html वर क्लिक करा.

यूट्यूबवरही प्रक्षेपण

इस्रोने यूट्यूबवरही या मिशनचं लाइव्ह प्रक्षेपण केलं आहे. तुम्ही रिमाइंडर लावून थेट प्रक्षेपण पाहू शकता. त्यासाठी इस्रोच्या https://www.youtube.com/watch?v=_IcgGYZTXQw या यूट्यूब चॅनलला भेट द्या.

दूरदर्शनवरही लाइव्ह पाहू शकता

याशिवाय सूर्यावरील स्वारीचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरही दाखवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदी आणि मराठी दूरदर्शन चॅनलवर जाऊन या मिशनचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.