अनंतनाग : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या दहशतवाद्यांना कोकरनागच्या जंगलात सुरक्षा दलांनी घेरले आहे. 2-3 दहशतवादी जंगलात लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. इतकंच नाही तर या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पॅरा कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. कोकरनागच्या जंगलात सुरू असलेल्या कारवाईचे व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
बुधवारी सुरक्षा अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले होते. सुरक्षा दलाचे अधिकारी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. ज्यामध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले.
लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना चकमकीदरम्यान गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने हलवण्यात आले मात्र या अधिकाऱ्यांना वाचवण्यात यश आले नाही. जखमी झालेल्या एका जवानाचाही गुरुवारी मृत्यू झाला. या दहशतवाद्यांना आता जवानांनी जंगलात घेरले आहे.
लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी संघटना असलेल्या टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात दहशतवादी उझैरचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. जवानांनी आता यांना घेरले आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कर हेलिकॉप्टर, क्वाडकॉप्टर आणि ड्रोनची मदत घेत आहे. विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Kokernag, Anantnag (J&K): Security forces are using IEDs to target those areas in the forest where they suspect terrorists are hiding. Drones and quadcopters are put in place to track down these areas. pic.twitter.com/pUsP8MZjCt
— ANI (@ANI) September 15, 2023
कोकरनागच्या जंगलात सुरक्षा रक्षक आता यांना ठार करण्यासाठी शोध घेत आहेत. जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आलीये. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, या दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकरच संपवले जाईल