मागच्या काही महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यक हिंदू समुदायावर हल्ले सुरु आहेत. भारताता या विरोधात निषेध मोर्चे सुद्धा निघाले. पण त्याने फार काही चित्र बदलेलं नाही. बांग्लादेशातील कट्टरपंथीय सातत्याने हिंदुंना टार्गेट करत आहेत. आता दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी बांग्लादेशचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिीरी गेट येथील ऑटो पार्ट्सच्या घाऊक व्यापाऱ्यांनी बांग्लादेशात हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून बांग्लादेशसोबत व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑटोमोटिव पार्ट्स मर्चेंट्स एसोसिएशनचे प्रेसिडेंट विनय नारंग म्हणाले की, “बांग्लादेशात हिंदुंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मिरी गेटच्या ऑटो पार्ट्स मार्केटने शेजारी देशासोबत बिझनेस न करण्याचा निर्णय घेतला आहे” एजन्सीने हे वृत्त दिलय. “बांग्लादेशात हिंदुंवर अत्याचार झाला. आमची मंदिर नष्ट करण्यात आली. आमच्या अनेक हिंदू बंधुंना मारण्यात आलं. हे चुकीच आहे, आमच्या बाजाराने बांग्लादेशसोबतचा व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घेतला आहे” असं विनय नारंग म्हणाले.
किती हजार दुकानदारांचा निर्णय?
“बांग्लादेश एक विकसनशील देश आहे. 15 जानेवारीपर्यंत कार पार्ट्सची निर्यात रोखण्याचा निर्णय तिथल्या ट्रान्सपोर्टेशनवर परिणाम करु शकतो. जवळपास 2000 दुकानांनी बांग्लादेशला एक्सपोर्ट बंद केला आहे” असं विनय नारंग म्हणाले.
नरसंहाराचा आरोप
यूनुस सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार डॉ तौहीद हुसैन यांनी 23 डिसेंबरला एक राजनयिक नोट पाठवून मागणी केली. त्यांनी लिहिलेलं की, ‘लीगल प्रोसेससाठी हसीनाच प्रत्यर्पण करा’ हसीन यांच्या राजवटीत हिंसाचार झाला. अनेक आंदोलकांना नुकसान पोहोचवण्यात आलं, असा विद्यमान सरकारचा आरोप आहे. हसीना आणि त्यांच्या माणसांविरोधात दाखल 60 पेक्षा जास्त तक्रारींमध्ये नरसंहाराचा आरोप सुद्धा आहे.
खास अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही
या प्रकरणांच्या चौकशीसाठी बांग्लादेश सरकारला हसीना आणि त्यांच्या पक्षाच्या अवामी लीगच्या अनेक नेत्यांना अटक करायची आहे. म्हणून ते भारताकडे हसीन यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करत आहेत. हा डिप्लोमेटिक मॅसेज सुद्धा याच संदर्भात होता. पण तो औपचारिक नव्हता, नोट वर्बल होती. त्याच्यावर कुठल्या खास अधिकाऱ्याची स्वाक्षरी नव्हती.