सि़डनी : भारताने मागच्या महिन्यात चंद्रावर यशस्वीरित्या चांद्रयान-3 च सॉफ्ट लँडिंग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. त्याचवेळी यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील चौथ देशही आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग सोप नव्हतं. खूप अवघड, किचकट प्रक्रिया होती. पण इस्रोच्या वैज्ञानिकांनी ही कमाल करुन दाखवली. त्यामुळे भारताच हे यश साधसुध नाहीय. जगातील अनेक देशांना भारताच्या या अचाट कामगिरीच आश्चर्य वाटतय. काही देशांनी भारतापासून प्रेरणा घेतली आहे. यात ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया आता मून मिशनची तयारी करत आहे. पण ऑस्ट्रेलिया स्वत: चंद्रावर जाणार नाहीय.
NASA च्या Artemis मून मिशनच्या माध्यमातून आपला रोव्हर चंद्रावर पाठवणार आहे. 2026 पर्यंत हे मिशन पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा एक रोबोटिक रोव्हर असेल. चंद्राच्या पुष्ठभागावरील मातीचा अभ्यास करण्यात येईल. ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने ही घोषणा केली आहे. ASA नासाच्या मदतीने हे मिशन करत आहे. ऑस्ट्रेलिया स्वत:च आपला रोव्हर डिझाइन करणार आहे. ऑस्ट्रेलिया संपूर्ण जगात आपल्या कम्यूनिकेशन सिस्टमसाठी ओळखला जातो. त्यामुळे रोव्हरशी थेट संपर्क ठेवण्याचा प्रयत्न होईल. एलन मस्कची कंपनी SpaceX स्टारशिप फॉल्कन हेवी रॉकेटच्या माध्यमातून हा रोव्हर चंद्रावर पाठवला जाईल. मातीची सँपल आणल्यानंतर नासा या सॅम्पलमधून Oxygen बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे भविष्यात माणूस चंद्रावर जाईल तेव्हा त्या मातीतून ऑक्सिजन घेता येईल.
रोव्हरच्या नावाची घोषणा कधी होणार?
ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने सध्या या रोव्हरला कुठलही नाव दिलेलं नाही. लोकांनीच या रोव्हरला नाव द्यावं, असं अपील केलं आहे. फक्त तुम्ही ऑस्ट्रेलियाच नागरिक हवे एवढीच अट आहे. त्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. 20 ऑक्टोबर 2023 ही रोव्हरसाठी नाव सुचवण्याची अखेरची तारीख आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी रोव्हरच्या नावाची घोषणा करेल.