Samudrayaan | चांद्रयान-3 नंतर आता समुद्रयान, भारताची खास सबमर्सिबल, काय आहे प्रोजेक्ट?

| Updated on: Sep 11, 2023 | 3:56 PM

Samudrayaan | 'मत्स्य' नावाची ही खास पाणबुडी बनवली आहे. काय आहे भारताच मानवी मिशन?. फक्त अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि फ्रान्स या देशांनाच सबमर्सिबल डेव्हल्प करता आली आहे. मिशनमागे उद्देश काय आहे?

Samudrayaan | चांद्रयान-3 नंतर आता समुद्रयान, भारताची खास सबमर्सिबल, काय आहे प्रोजेक्ट?
Project Samudrayaan
Follow us on

मुंबई : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताच आता मिशन आदित्य एल 1 ही सूर्य मोहीम सुरु आहे. भारतीय वैज्ञानिक प्रोजेक्ट समुद्रयानची सुद्धा तयारी करत आहेत. महासागराच्या पोटात 6,000 मीटर खोलवर सबमर्सिबल पाठवण्यात येणार आहे. प्रोजेक्ट समुद्रयान ही भारताची मानवी मोहीम आहे. धातू आणि खनिजांचा शोध घेणं हा प्रोजेक्ट समुद्रयानचा उद्देश आहे. समुद्राच्या पोटात असलेल्या कोबाल्ट, मँगनीज आणि निकेल सारख्या खनिजांचा शोध घेण्यात येईल. मागच्या दोन वर्षांपासून ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबलची बांधणी सुरु आहे. बंगालच्या उपसागरात 2024 च्या सुरुवातीला ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबलच्या चाचण्या सुरु होतील. जून 2023 मध्ये टायटॅनिकचा ढिगारा पाहण्यासाठी गेलेल्या टायटन सबमर्सिबलचा स्फोट झाला होता. त्यामुळे ‘मत्स्य’ 6000 च्या डिझाझनची पुन्हा एकदा अत्यंत बारकाईने तपासणी सुरु आहे.

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ ‘मत्स्य’ 6000 ची बांधणी करत आहेत. त्यांनी डिझाइनची पाहणी केली. “खोल समुद्रात शोधकार्य हे मिशन समुद्रयानच उद्देश आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत आम्ही 500 मीटर खोलीवर पहिली चाचणी करणार आहोत” असं पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी ही माहिती दिली. मुख्य मिशनला 2026 मध्ये सुरुवात होणार आहे. फक्त अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि फ्रान्स या देशांनाच सबमर्सिबल डेव्हल्प करता आली आहे.

सबमर्सिबलमधून किती जणांना समुद्राच्या तळाशी पाठवणार?

कोबाल्ट, मँगनीज आणि निकेलशिवाय रासायनिक जैवविविधता, हायड्रोथर्मल वेंट आणि कमी तापमानातील मिथेनचा शोध घेण्यात येईल. या मिशनमध्ये भारत तीन जणांना ‘मत्स्य’ सबमर्सिबलमधून पाठवणार आहे. 6000 मीटर खोलीच प्रेशर घेण्याची या सबमर्सिबलची क्षमता आहे. सलग 12 ते 16 तास पाण्याखाली राहून ही सबमर्सिबल काम करु शकते. 96 तास पुरेल इतक्या ऑक्सिजनची व्यवस्था मस्त्यमध्ये असेल. ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबल समुद्राच्यावर असणाऱ्या जहाजाच्या संपर्कात असेल.