नवी दिल्ली : भारताच मिशन चांद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर जग ISRO ला सलाम करतय. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पुष्ठभागावरुन उतरुन काम सुरु केलय. जगातील अनेक देशांमध्ये स्वत:ला इस्रोसोबत जोडण्यासठी स्पर्धा सुरु झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश आहे. भारताच्या या यशाने जगातील अनेक देशांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
कमी बजेटमध्ये यशस्वी प्रोजेक्ट कसे करायचे? हे दक्षिण कोरियाला इस्रोकडून शिकायच आहे. सौदी अरेबियाने सुद्धा G-20 मीटिंग व्यतिरिक्त इस्रोसंबंधी चर्चा केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या बद्दलची पुष्टी केली. यशस्वी लँडिंगने अनेक मार्ग मोकळे झालेत. चंद्रावर संशोधन आणि अवकाश संशोधनाच्या अन्य क्षेत्रात भारत जगाच्या मदतीसाठी तयार आहे.
जगाची नजर भारतावर
भारत G-20 चा अध्यक्ष असताना मिशन चांद्रयान-3 यशस्वी झालं. वेगवेगळ्या भागात या संबंधी अनेक सेमिनार सुरु आहेत. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठी मीटिंग होणार आहे. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष यामध्ये सहभागी होतील. जगाची नजर भारतावर आहे. भारताने मोठं यश मिळवलय.
… … and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W
— ISRO (@isro) August 25, 2023
भारताच्या आधी फक्त तीन देशांना करता आलय
इस्रोला चांद्रयान-3 मिशनसाठी फक्त 600 कोटी रुपये लागले. 14 जुलैला हे मिशन लॉन्च झालं होतं. 23 ऑगस्टला यशस्वी लँडिंग झालं. नासासह जगभरातील अनेक अवकाश संशोधन संस्थांनी या यशासाठी इस्रोला सलाम केलाय. भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरलाय. भारताच्या आधी अमेरिका, चीन, आणि सोवियत संघाने अशी कामगिरी केलीय.
चंद्रावर लँडिंगनंतर आता प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर Active आहेत. इस्रोने अनेक फोटो आणि व्हिडिओ टि्वट केले आहेत. त्यातून चंद्राबद्दलची माहिती मिळतेय. 14 दिवस प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर चंद्रावर काम करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध हा या मिशनमागचा मुख्य उद्देश आहे.