डरबन : “हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण शंखनादाच आहे. नव्या भारताच्या जयघोषणाचा क्षण आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा क्षण आहे. हा 140 कोटी देशवासियांच्या सामर्थ्याचा आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणाले. “आपण हे ऐतिहासिक क्षण अनुभवतो, तेव्हा अभिमान वाटतो. ही नव्या भारताची पहाट आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “आपण जमिनीवर संकल्प केला आणि चंद्रावर स्वप्न साकार केलं. भारत आता चंद्रावर पोहोचला आहे” असं पीएम मोदी म्हणाले.
“आपल्याआधी कोणी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेलं नाही. आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे आपण तिथे पोहोचलोय” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘एकट्या भारताच मिशन नाहीय’
“हे फक्त एकट्या भारताच मिशन नाहीय. हे मानवतेच यश आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “कधी म्हटलं जायच चंद्रमामा लांब आहे . पण आता एकदिवस असाही येईल, जेव्हा मूल म्हणतील चंदामामा फक्त एका टूरचे आहेत” असं मोदी म्हणाले. भारताच्या चांद्रयान-3 ने आज चांद्रभूमीवर यशस्वी लँडिंग केलं. 2019 मध्ये अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज साकार झाले. सगळ्या भारतीयांचे डोळे आजच्या या क्षणाकडे लागले होते.